रत्नागिरी : शहरातील प्रभाग क्र. ४ मध्ये विजेच्या वापरापेक्षा येणाऱ्या भरमसाठ लाईटबिल बाबत कार्यालयात उपस्थीत असलेले उपसहाय्यक अभियंता श्री. तीरमारे यांना पुराव्यासहित निदर्शनात आणून देण्यात आले.तसेच वारंवार तक्रारी देऊनही संबंधितांकडून उडवा उडवीची उत्तर मिळत असल्याने होणाऱ्या त्रासा बाबत त्रस्त नागरिकांकडून नाराजीही व्यक्त करण्यात आली. कहर तर त्यावेळी झाला काही नागरिक तर दोन महिन्यांहून अधिक काळ घरा मध्ये येऊन जाऊन राहत आहेत तरी त्यांची बिले ७००० ते ९००० पर्यंत आकारण्यात आली होती व आधीच्या महिन्यांची बिले ३५० ते ५५० पर्यंत होती आश्याच बराच्य लाईट बिल विषयी गंभीर बाबी राष्ट्रवादी काँग्रेस मार्फत निदर्शनात आणण्यात आल्या.
लाईट बिल संदर्भात या सर्व गंभीर बाबिंची दखल घेऊन उपसहाय्यक अभियंता श्री. तीरमारे यांनी सदोष मीटर दुरुस्त करून देऊ तसेच वेळेत योग्य सहकार्य केले जाईल जेणेकरून नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागणार नाही असे ही सांगितले.
यापुढे जनतेच्या हक्कासाठी नेहमीप्रमाणे सदैव तत्परतेने आम्ही उपलब्ध राहू असे राष्ट्रवादीचे नेते वा सामाजिक कार्यकर्ते फरहान मुल्ला यांनी सांगितले. प्रभाग क्र.४ महीला अध्यक्ष सौ. मुनव्वर-सुलताना फरहान मुल्ला यांनी निवेदन देतेवेळी लवकरात लवकर ही गंभीर बाब मार्गी लावावी अशी मांगणी केली यावेळी उपस्थित महीला तालुका अध्यक्ष सौ. शमीम नाईक, सामाजिक करकर्ते राहील मुकादम, श्री. निहाल झापडेकर व प्रभागातील नागरीक उपस्थित होते. याचे नियोजन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा महासचिव नौसीन काझी यांच्या मार्फत करण्यात आले होते.