कॅप्टन एस.पी.सूर्यवंशी सेवा- गौरव संपन्न

 गेवराई - दि ६ (प्रतिनिधी ) - आयुष्यभर शिस्तीचे धडे देत शैक्षणिक सेवा करीत असलेल्या शंकर सूर्यवंशी यांनी केलेल्या निष्ठा प्रामाणिकपणा या वैशिष्टयांचा निश्चितच फायदा पुढील आयुष्यात होईल असा आशीर्वाद कर्तव्यपूर्ती - सेवा गौरव सोहळ्यानिमित्त चिंतेश्वर संस्थांचे मठाधिपती ह.भ.प.दिलीप घोगे महाराज यांनी व्यक्त केले. गेवराई येथील जि. प .मा. शाळेचे (मुलांची ) सहशिक्षक तथा एन सी सी ऑफिसर कॅप्टन शंकर पांडूरंग सूर्यवंशी ऊर्फ एस.पी. यांच्या 37 वर्ष शिक्षकी सेवेचा कर्तव्यपूर्ती सेवा गौरव कार्यक्रम नुकताच शाळच्या वतीने पार पडला . मंचावर ह.भ.प. दिलीप महाराज घोगे , प्राचार्य बी. एस. येवले, गटशिक्षण अधिकारी गोपाळघरे, शिक्षण विस्तार अधिकारी प्रविण काळम पाटील, शाळेचे मुख्याध्यापक राजकुमार पोपळघट, गोदावरी मल्टिस्टेटचे प्रभाकर पराड,राष्ट्रीय नाभिक एकता महासंघाचे अध्यक्ष भगवान अण्णा बिडवे, नाशिक मनपाचे माजी शिक्षण समिती प्रमुख किरण बिडवे , सेनेचे तालुका प्रमुख शिनुभाऊ बेद्रे,जेष्ठ शिक्षक बी. एन. जोशी ,चाळक, प्राचार्य राजेंद्र घुंबार्डे, गुरुजी ,सौ प्रतिभा शंकर सूर्यवंशी आणि माता - पिता यांची उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते सपत्नीक सत्कार करण्यात आला. सूर्यवंशी यांच्या वतीने पाहुणे व गुरुजनांना विठू - रुखमाईच्या प्रतिमा भेट म्हणून देण्यात आल्या. सेवागौरव कार्यक्रमाची सुरुवात एस. पी. सूर्यवंशी यांच्या शहरातून भव्य सवाद्य मिरवणुकीने झाली. त्यानंतर शाळेत त्यांचे आगमन झाले ते फटाक्याच्या आतिषबाजीने. आद्य शिक्षिका सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांनी केल्या नंतर पाहुण्यांचे व उपस्थितांचे स्वागत गेवराई येथील संगीत विद्यालयाचे तुळशीराम आतकरे यांच्या सह कलाकारांनी स्वागत गीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली. सहशिक्षक सावंत यांनी प्रास्ताविकात गौरवमूर्तींचा जीवनपट उलघडून सांगितला. माजी विद्यार्थी - व्याख्याता रामानंद तपासे यांचे मनोगत व्यक्त करण्यात आले. मान्यवरांची गौरवपर भाषणे झाली. विविध शिक्षक व सामाजिक संघटनेच्या वतीने श्री व सौ .सूर्यवंशी यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये गे. ता .शिक्षक सह पतसंस्था, परिवर्तन पॅनल, सेवानिवृत्त शिक्षक, योगा ग्रुप ,गुड मॉर्निंग ग्रुप, माजी विद्यार्थी, नाभिक महासंघ तसेच शाळेच्या शिक्षकवृंदांनी शुभेच्छा देऊन सत्कार केला. कार्यक्रमास डी. यू. कांडेकर, मुख्याध्यापक महादेव घोळवे, कैलास जोगदंड, गणेश शहाणे ,माजेद काजी ,ब्रम्हनाथ येळम, बापू तारुकर, सावंत , खतीब, विष्णू जाधव, कुडके, दयानंद पंडित, मस्के, कैलास पट्टे , राठोड, जाधव ,दहिफळे,बी. बी. गायकवाड,सुळे नामदेव शिंदे, अर्जून बारगजे ,प्रविण पंडित, कांतीलाल लाड, अॅड. राम देशपांडे ,एस. डी. जरांगे, प्रकाश भुते, प्रा राजेंद्र बरकसे ,प्रभाकर घोडके, दिलीप जोशी ,अरुण वायचळ, दिनकर शिंदे, एकनाथ लाड ,दयानंद कांडेकर, सुभाष शिंदे, तात्यासाहेब मेघारे, विष्णू खेत्रे ,पो. अधिकारी सतीश खरात, सुनिल पोपळे, ज्ञानेश्वर चातूर ,नाना पंडित, खंडागळे , त्यांचे इतर सहकारी वैजिनाथ फुलझळके, नगर येथील टेमकर , फौजी बालाजी सुरवसे, अरुण परदेशी , सुधीर सूर्यवंशी , हिंगोलीचे उपलेखा अधिकारी तुळशीराम वाघमारे ,भारत ठोंबरे ,डॉ. शंतनू शंकर सूर्यवंशी, डॉ. शुभांगी सचिन वाघमारे , डॉ सचिन वाघमारे, डॉ. शिवराज सूर्यवंशी ,डॉ. कल्याणी शिवराज सूर्यवंशी यांच्यासह मित्र परिवार ,आप्तेष्ठ, नातेवाईक ,बीड जिल्ह्यातील मोठ्या संख्येने शिक्षक मित्र , शिक्षिका, महिला, पत्रकार ,समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. गुरुजनांच्या उपस्थितीत शिष्यांचा सेवा गौरव पूर्ती सोहळा संपन्न झाला.या भव्य दिव्य सेवा गौरवपूर्ती सोहळ्याचे सूत्रसंचालन शाळेचे शिक्षक शिवाजी झेंडेकर यांनी तर आभार सावंत यांनी मानले .कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक वृंद, विद्यार्थी, कर्मचारी इत्यादीनी परिश्रम घेतले. कार्यक्रम तब्बल तीन ते चार तास सुरू होता .या भव्य कार्यक्रमाची सांगता आभाराने झाली.