माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी परंपरेनुसार आपला दसरा परळीकरांच्या सोबत काळरात्री मंदिर येथे साजरा केला. श्री. मुंडे यांनी सायंकाळी काळरात्री देवीचे दर्शन घेऊन आपल्या सहकार्यांसोबत मंदिर परिसरात येणार्या परळी शहरातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या.
पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट - बूंदी
पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट कीऔर से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मंदिराच्या बाहेर एक पेंडॉल उभारण्यात आला होता. परळी वासीयांनी या ठिकाणी धनंजय मुंडे यांना शुभेच्छा देण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती. यावेळी एकमेकांना आपट्याची पाने देऊन शुभेच्छांची देवाणघेवाण रात्री उशिरापर्यंत सुरू होती. धनंजय मुंडे यांच्या सह उपस्थित सर्वांनी यावेळी देवीच्या पालखीचेही दर्शन घेतले.
समोरच भारतीय जनता पक्षाच्या वतीनेही शुभेच्छा देण्यासाठी पेंडॉल उभारला होता मात्र तिकडे तुरळक लोक सोडता फार गर्दी दिसली नाही. शेवटी धनंजय मुंडे हेच मनाचा मोठेपणा दाखवत थेट भाजपच्या पेंडॉल मध्ये गेले व तिथे उपस्थित सर्व पदाधिकार्यांना आपट्याची पाने देऊन गळाभेट देऊन शुभेच्छा देऊन आले. त्याचबरोबर त्यांनी वंचित बहुजन आघाडी व काँग्रेसच्या पेंडॉल मध्ये जाऊनही संबंधित पक्षाच्या पदाधिकार्यांना शुभेच्छा दिल्या.
अशोक विजयादशमी तथा धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त धनंजय मुंडे यांनी काळरात्री मंदिराजवळच असलेल्या बौद्ध विहार येथे जाऊन भगवान गौतम बुद्ध, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई आंबेडकर