शिरुरमध्ये महिलेने घातला नोकरीच्या आमिषाने दहा लाखांना गंडा

( शिरूर प्रतिनिधी ) शिरुर ता. शिरुर येथील सुरज नगर मध्ये राहणाऱ्या एका युवकाला चक्क एका महिलेने नोकरीच्या आमिषाने दहा लाख रुपयांना गंडा घातल्याची घटना घडली असल्याने शिरुर पोलीस स्टेशन येथे अरुधंती जयदीप तांबवेकर या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

                                    शिरुर येथील सुरजनगर मध्ये राहणारा नवनाथ सालके हा युवक शिक्षणानंतर नोकरीच्या शोधात असताना काही दिवसांपूर्वी नवनाथ च्या कुटुंबियांची पुण्यातील अरुधंती तांबवेकर या महिलेशी ओळख झाली त्यांनतर सदर महिलेने त्याला माझी रेल्वे विभागात ओळख आहे तुला चांगल्या नोकरीला लावते त्यासाठी काही पैसे खर्च करावे लागतील सांगितले त्यामुळे नवनाथचे वडील रघुनाथ यांनी सदर महिलेला रोख तसेच बँकेच्या खात्यात टाकून दहा लाख रुपये दिले, मात्र त्यानंतर अनेक दिवस सदर महिलेने नोकरी लागेल थांबा असे म्हणून काही दिवस घालवले मात्र त्यांनतर सालके यांचे फोन उचलणे देखील बंद केले व त्यांना काही प्रतिसाद दिला नाही त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्याने, रघुनाथ नाना सालके वय ४८ वर्षे रा. सुरजनगर शिरुर ता. शिरुर जि. पुणे यांनी याबाबत शिरुर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिरुर पोलिसांनी अरुधंती जयदीप तांबवेकर रा. पुणे या महिलेवर फसवणूक प्रकरणी गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक सुजाता पाटील या करत आहे.