औरंगाबाद:- दि.६ ऑक्टों.(दीपक परेराव)पंतप्रधान स्व निधी वित्तीय समावेशन आणि वित्तीय सहायता अभियानाअंतर्गत किमान औरंगाबाद शहरातील तीन हजार स्ट्रीट वेंडर यांना कर्ज वितरण केंद्रीय अर्थ राज्य मंत्री डॉ. भागवत कराड यांच्या हस्ते करण्यात आले.

स्व निधी मध्ये केंद्र सरकार सात टक्के व्याज भरते आणि लाभार्थ्यांना केवळ चार टक्के व्याज भरावे लागते. रस्त्यांवर व्यवसाय करणारे गोरगरीब यांना सावकारीच्या पाशातून मुक्त करण्यासाठी पी. एम एम स्व निधी योजना ही अत्यंत महत्त्वपूर्णआहे असे, राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी या पी एम स्व.नीधी कर्ज वितरण मेळाव्या प्रसंगी म्हटले आहे .

भारतीय स्टेट बँक आणि संभाजीनगर महानगरपालिका यांच्या वतीने संत एकनाथ रंग मंदिर मध्ये कर्ज वितरण आणि लाभार्थ्यांचे कर्ज मंजुरी पत्र या मेळाव्याप्रसंगी लाभार्थ्यांना देण्यात आले .

या मेळाव्यासाठी संभाजीनगरचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण ,स्टेट बँक ऑफ इंडियाचे विभागीय प्रबंधक रवी कुमार वर्मा, संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर अभिजीत चौधरी, रोहित काशाळकर ,जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक मंगेश केदार यांच्यासह मोठ्या प्रमाणात लाभार्थी उपस्थित होते.

साधारण तीन हजार स्ट्रीट वेंडर्स यांना स्टेट बँक ऑफ इंडिया व औरंगाबाद महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानाने रुपये दहा हजाराचे कर्ज वाटप करण्यात आले.

यामध्ये प्रामुख्याने भाजीपाला ,फळ विक्रेते , टपरी चालविणारे , चांभार, यांचा समावेश आहे.त्या सोबतच स्टेट बँक ऑफ इंडियाचे दहा स्टॉल्स संत एकनाथ रंगमंदिर येथे सात ऑक्टोबरला सकाळी दहा ते चार या दरम्यान सर्व पीएम स्व निधी लाभार्थ्यांसाठी, त्यांना केंद्र शासनाच्या विविध योजनांमध्ये व आर्थिक समावेशन या उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी उपलब्ध राहणार आहेत. 

या मेळाव्यामध्ये पीएम स्वनिधी लाभार्थ्यांना प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना, प्रधानमंत्री जनधन योजना व अटल पेन्शन योजनांमध्ये सहभागी होण्यासाठी आवाहन केले.

स्व निधि कर्ज हे सर्व सामान्य आहे पहिला हप्ता भरला असेल तर पुढील दुसरा हप्ता देखील मिळू शकतो व्यवसायांना त्यातून आधार मिळेल,आता यापुढे सामाजिक सुरक्षितता विमा योजनेचा फायदा देखील घ्यावा असे संभाजीनगरचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी म्हटले आहे.

यापूर्वी भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात होता. जनधन मोबाईल आणि आधार कार्ड च्या माध्यमातून डीबीटी द्वारे थेट पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होतात परिणामी भ्रष्टाचार देखी नियंत्रित आला आहे. पीएम स्व निधी कर्ज वेळेवर परत केल्यावर पुढील टप्प्यात वीस आणि पन्नास हजाराचे कर्ज सर्व लाभार्थ्यांना करण्यात येईल. त्यासाठी, लाभार्थ्यांनी प्रामाणिकपणे पैसेही परत करणे आवश्यक आहे .असे मतही केंद्रीय अर्थमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी मेळाव्या प्रसंगी व्यक्त केले आहे.