बौद्ध उपासक व उपासिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती
पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट - बूंदी
पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट कीऔर से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं
जिंतूर--देशात शेतकऱ्यांच्या न्याय हक्क मागण्या साठी देशातील कोकणात पहिला मोर्चा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी काढला अशी माहिती प्रसिद्ध व्याख्यात्ये मराठा सेवा संघाचे प्रवक्ते सुभाष ढगे यांनी दिली.ते जिंतूर येथे आयोजित 66 व्या धम्मचक्र प्रवर्तन दीना निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.त्यांनी पुढे असेही सांगितले की कोणत्याही समाजकार्याचा गाढा पुढे चालवण्यासाठी मदतीचा खंबीर वारसा पाठीशी लागतो.जसे तथागता नंतर बौद्ध धम्माचा सबंध जगात प्रसार आणि प्रचार सम्राट अशोक राजांनी केला. त्यांच्या शिवाय धम्माचा प्रचार व प्रसार अशक्य होता.तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना छत्रपती शाहू महाराजांच्या राजकीय वारसा रूपाने विविध धम्म कार्यासह समाजकार्यात बाबसाहेबांना मदत झाल्याची सविस्तर माहिती ढगे यांनी दिली.धर्मातरा पूर्वी त्यांनी जगातील सबंध धर्माचा अभ्यास करून समता बंधुता,व वैज्ञानिक दृष्टीकोण ज्या बौद्ध धर्मात आहे.अश्या बौद्ध धर्म त्यांनी स्वीकारला अशी माहिती सुद्धा त्यांनी दिली.ज्या मनुस्मृतीत स्त्रियांना स्वातंत्र्य नव्हते त्या मनुस्मृतीचे दहन व महाडच्या चवदार तळ्याचे आंदोलन करून बाबासाहेबांनी देशात क्रांती घडवली असे मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आ.विजय भांबळे यांनीही डॉ.बाबासाहेबांनी धर्मांतर करण्या पूर्वी जगातील सर्व धर्माचा अभ्यास करून ज्या व्यवस्थेने आम्हाला स्वीकारले नाही.म्हणून हिंदू म्हणून जन्मलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही अशी शपथ घेऊन ज्या बौद्ध धर्मात मानवता मूल्ये जपली जातात अश्या बौद्ध धर्माचा 5 लाख अनुयायाच्या साक्षीने 14 ऑक्टोंबर 1956 ला बौद्ध धर्म स्वीकारल्याची माहिती विजय भांबळे यांनी दिली.
माजी समाज कल्याण सभापती रामराव उबाळे यांनी समाज बांधवानी मुलांना सुशिक्षित करून डॉक्टर,इंजिनियर अवश्य करा पण खरे समाजकार्य घडवून समाजाची राजकीय,सामाजिक प्रगती घडवायची असेल तर मुलांना राजकारणात सुद्धा सक्रिय राहू द्या असे आव्हान उबाळे यांनी केले. पंचशील व निळ्या ध्वजाचे ध्वजारोहण विजय भांबळे यांच्या हस्ते करण्यात आले.
मंचावर अध्यक्ष म्हणून माजी आमदार विजय भांबळे तर प्रमुख व्याख्याते म्हणून सुभाष ढगे माजी नगराध्यक्ष बाळासाहेब भांबळे, रामराव उबाळे,भास्कर पिंपळकर,राहुल कांगने,दत्ता काळे,चंद्रकांत बहिरट,संजय निकाळजे,उस्मान,सोहेल,अहमद बागवान,आशाताई उबाळे प्रतिभाताई हरभरे, कविता घनसावध,आशा खिल्लारे,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार देवानंद सावंत यांनी तर धम्म वंदना राजेंद्र घनसावध व विकास मोरे यांच्या हस्ते संपन्न झाली.कार्यक्रमच्या यशस्वीते साठी सार्वजनिक जयंती मंडळाने परिश्रम घेतले.