रक्कम रु ७,५०,०००/-चा धनादेश न वटल्या प्रकरणी हॉटेल विक्रम बिअरबार अँड परमिटरूम मालक चालक शहाजी वरवट यास दोन वर्षे शिक्षा व १५,००,०००/- नुकसान भरपाई
फिर्यादीची थोडक्यात हकिकत अशी की, फिर्यादी अर्चना अशोक तावरे ह्या सेंट अँन्स इंग्लिश स्कूल मध्ये सहशिक्षिका म्हणून काम करतात व आरोपी शहाजी संपतराव वरवट हे विक्रम हॉटेल बिअर बार अँड परमिटरूम चालवतात. आरोपी व फिर्यादी आपसात जवळचे नातेवाईक आहेत. आरोपीने हॉटेल व्यवसाया करिता तसेच घरगुती अडचणी निवारण्या करीता रकमेची आवश्यकता भासली तसेच फिर्यादीचे सासरे नामे शिवाजी माधव तावरे यांचे नावे असलेली बीड तरफ बलगुजर येथील सर्वे नंबर ५ मधील विक्री केल्याचे आरोपीस माहीत असल्याने दिनांक २०/०७/२०१६ रोजी फिर्यादिस ७,५०,०००/- ची मागणी केली फिर्यादीने आरोपिसोबतचा मागील व्यवहार लक्षात घेता व नाते संबंधाचा विचार करून आरोपीस ७,५०,०००/- नगदी रोख हातउसने दिले त्यावेळी आरोपीने सदरची रक्कम एका वर्षाचे आतमध्ये परत करण्याचे तोंडी अश्वाशन व अभिवाचन दिले. त्यानंतर फिर्यादीने त्यांचे घरगुती अडचणीकरिता फिर्यादीने आरोपीस दिलेल्या ७,५०,०००/- ची मागणी दिनांक २२/०३/२०१८ रोजी केली असता आरोपीने सांगितले माझ्याकडे एवढी रोख रक्कम उपलब्ध नाही. मी तुम्हास सदर रकमेचा एक धनादेश देतो असे म्हणून आरोपीचे खाते असलेल्या उस्मानाबाद जनता सहकारी बँक ली शाखा बीड खाते क्रमांक ७१४ चा धनादेश क्रमांक ५५३७४७ रक्कम रु ७,५०,०००/- दिनांक २३/०३/२०१८ रोजीचा लिहून फिर्यादीच्या हक्कात दिला. सदर धनादेश दिलेल्या तारखेस वटला जाईल याची हमी दिली. फिर्यादीने सदर धनादेश दिलेल्या तारखेस वटवण्यास टाकला असता खात्यात पुरेशी रक्कम नाही या शेऱ्यासह सदर धनादेश न वटता परत आला. सदरचा धनादेश न वटता परत आल्याने फिर्यादीने धनादेशावरील रकमेची मागणी करणारी नोटीस आरोपीस पाठवली. सदर नोटीस आरोपीस मिळून देखील आरोपीने सदर रक्कम फिर्यादिस मुदतीत दिली नाही. त्यानंतर फिर्यादीने मा. मुख्य. न्यायदंडाधिकारी बीड. यांचे न्यायलयात आरोपीविरुद्ध कलम १३८ एन. आय. अॅक्ट प्रमाणे तक्रार दाखल केली. सदर प्रकरणात फिर्यादीतर्फे साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आल्या. सदर प्रकरणात फिर्यादीने दाखल सर्व दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन करून व अॅड. सागर नाईकवाडे यांनी केलेला युक्तिवाद गृहीत धरून मा. प्रथमवर्ग न्यादंडाधिकारी साहेब बीड यांनी आरोपिणे जाणीवपूर्वक खात्यामध्ये पुरेशी रक्कम नसताना फिर्यादिस धनादेश दिल्यामुळे मा. प्रथमवर्ग न्यादंडाधिकारी साहेब बीड. यांनी आरोपीस धनादेशावरील रक्कम ७,५०,०००/- (सात लाख पन्नास हजार रुपये) व नुकसान भरपाई असे मिळून एकूण १५,००,०००/-(पंधरा लाख रुपये) अशी नुकसान भरपाई व दोन वर्षे कारावासाची शिक्षा दिनांक ०६/१०/२०२२ रोजी दिली. या प्रकरणात फिर्यादीतर्फे
अॅड. सागर नाईकवाडे यांनी काम पाहिले. त्यांना अॅड. राजेश जाधव, अॅड. सुधिर जाधव, अॅड. सतीश गाडे, अॅड. विवेक डोके यांनी सहकार्य केले.