रत्नागिरी : पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्यात महावितरणने विशेष कामगिरी बजावली. केवळ १५ दिवसांत ५८ हजार ४५७ घरगुती ग्राहकांना नवीन वीजजोडण्या दिल्या. तसेच प्रलंबित ४४ हजार ६६९ ग्राहकांच्या वीजबिलावरील नावात बदल करण्याचे सर्व अर्ज निकाली काढले. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यात १ हजार ५३८ आणि सिंधुदुर्ग -३६१ नवीन ग्राहक तर रत्नागिरी १ हजार १६० व सिंधुदुर्गमधील ३३२ ग्राहकांच्या नावात बदल करून शासनाच्या या उपक्रमाचे महावितरणने १०० टक्के उद्दिष्ट्य साध्य केले.

Sponsored

पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट - बूंदी

पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट कीऔर से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

पंधरवड्यात १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या काळात ग्राहकांच्या प्रलंबित असलेल्या विशेषत: नवीन वीजजोडणी व ग्राहकांच्या वीजबिलावरील नावात बदल करणे या प्रकारच्या तक्रारींचे निवारण करण्याचे आदेश महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिले होते. महावितरणने नवीन वीजजोडणीसोबतच ग्राहकांच्या वीजबिलावरीलनावात बदल करण्याची ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली आहे.