आज दिनांक 5 ऑक्टोंबर रोजी समाजहितासाठी सामाजिक कार्य करणारी सामाजिक संस्था समाजहित अभियान प्रतिष्ठान संचलित भिक्षा मुक्त परभणी अभियान अंतर्गत 66 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिन, अशोक विजयादशमी, दसरा निमित्त परभणी शहरातील स्टेशन, बस स्टँड, धार्मिक स्थळ व इतर ठिकाणी समाजातील दुर्लक्षित घटक, गोर, गरीब, गरजू भिक्षावृत्त करणारे निराधार, व फिरून भिक्षाटन करणाऱ्या महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले. 

 

हा सामाजिक उपक्रम यशस्वी करण्यासाठी समाजहित अभियान प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष प्रमोद अंभोरे, राज्य प्रसिध्दी प्रमुख शेख अझहर, महिला अध्यक्षा रमाताई घोंगडे, सदस्या सरिताताई अंभोरे, रेखाताई कांबळे, जयश्री निकाडजे, सविताताई घोगरे, राहुल घोंगडे, प्रेम तूपसमुद्रे, संदीप वायवळ, राहुल धबाले, बाळू भाऊ घिके, राजू कर्डिले, बालाजी कांबळे, सय्यद जमील, रियाझ खुरेशि, अजय शिराळे, आकाश साखरे, आकाश राक्षे, गोविंद गिरी, दीपक बनसोडे, शंकर बनसोडे, खिझर भाई, आदींनी परिश्रम घेतले