आष्टी (प्रतिनिधी) आष्टी तालुक्यातील पिंपळगाव (दाणी) गावातील पुल व रस्ता लवकर बनवुन द्यावे या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना बाल हक्क संरक्षण संघाने सोमवार दि.३ आँक्टोबर २०२२ रोजी दिले.निवेदना पुढे असे म्हटले आहे की, पिंपळगाव (दाणी) येथिल ५० विद्यार्थी मौजे मेहकरी (ता.आष्टी)येथिल शाळेत जात होते. परंतु हे सर्व विद्यार्थी २० दिवसांपासुन शाळेत जाऊ शकले नाही.कारण नदी वरील पुल पाऊसाच्या पाण्यानी वाहुन गेला असल्याने नदि पलिकडे जाण्यासाठी दुसरा मार्ग च राहिला नाही. नदीतून शाळेला गेले आणि पाऊसमुळे नदीचे पाणी वाढले तर घरी जाणार कसे? थांबणार कोठे? नदीतून येता-जाता जिवितहानी होण्याचा धोका. बीड जिल्ह्यात इतर ठिकाणी वाहुन जाण्याच्या घटना घडल्या आहेत त्यामुळे मुलांसह पालकांनाहि याची भिती वाटते.तसेच पाटा (कँनल) मार्ग जो रस्ता आहे तेथुन ६ (सहा) किलोमिटर पायी जावे लागते पण तो हि रस्ता चिखलमय असल्याने चपला घालून चालता येत नाही.विना चपला चालले तर पायात काटे टोचुन पाय रक्तबंबाळ होत आहेत. फक्त पुल व चांगला रस्ता नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.शिक्षण हा त्यांचा हक्क असून त्यांना येणाऱ्या अडचणी आपण दुर केल्या पाहिजेत.या करिता आपण लवकरात लवकर हा प्रश्न कायमचा मार्गी लावून देशाचे भविष्य असलेल्या ह्या विद्यार्थ्यांना त्यांचा शिक्षणाचा हक्क मिळवून द्यावा.पुल व चांगला रस्ता करुन द्यावे कारण आपल्या जिल्ह्यात पाण्यात वाहून गेलेले घटना घडल्या आहेत ते यापुढे घडु नयेत यासाठी आपणास कळकळीची विनंती करतोय कि आपण या प्रकरणात लक्ष केंद्रित करावे व आष्टी तालुक्यापासून संपर्क तुटलेल्या पिंपळगाव (दाणी) गावाला चांगला रस्ता व पुल बांधून पुन्हा तालुक्याशी त्या गावाचा संपर्क जोडावा. या मागणीचे निवेदन रहेमान सय्यद सामाजिक कार्यकर्ते तथा बीड जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) बाल हक्क संरक्षण संघ महाराष्ट्र राज्य यांनी जिल्हाधिकारी बीड यांना दिले आहे. ह्या प्रकरणात जिल्हाधिकारी काय,कशी व कधी भुमिका घेतात हे पाहणे हि महत्त्वाचे आहे.

Sponsored

पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट - बूंदी

पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट कीऔर से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं