जिंतूर: शहरामध्ये विजयादशमी च्या सणानिमित्ताने पूर्वसंधी पासूनच सोने वस्त्र झेंडूची खरेदी करण्यासाठी शहरातील बाजारपेठ गर्दीने फुलली होती. मंगळवार सायंकाळपासूनच बाजारपेठेमध्ये ग्राहकांची गर्दी दिसून आली. साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणजे विजयादशमी, विजया दशमीच्या सणाला कपडे, तोरण करण्यासाठी झेंडूची फुले, पूजा साहित्य आदी वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली.
दुसऱ्याच्या दिवशी म्हणजे आज आपट्याच्या पानास आणि झेंडूच्या फुलांना मोठे महत्त्व असते. यात खरी साठी जिंतूर शहरातील मुख्य बाजारपेठेत छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जिंतूर पोलीस ठाणे या परिसरामध्ये ग्राहकांची वर्दळ सकाळपासूनच होती. तालुका जवळपास तालुक्यातील सर्वच खेड्यांमधून मोठ्या प्रमाणावर झेंडूची फुले विक्रीसाठी आले आहेत. सकाळी या फुलाचा भाव ५० ते ६० रुपये किलो पर्यंत होता. शहरातील मार्केटमध्ये ठीक ठिकाणी फुलांचे ढीग दिसून आले. यंदा झेंडूची फुले जी किंमत ५० ते ६० रुपये असूनही खरेदीला ग्राहक प्राधान्य देताना दिसत आहे. दरम्यान इलेक्ट्रॉनिक सोने अलंकार कपड्याच्या दुकानातही अशाच प्रमाणे गर्दी दिसत आहे.