पाटोदा (प्रतिनिधी) येवलवाडी ग्रामपंचायत अंतर्गत सन 2018 ते 2022 या कालावधी मध्ये वित्त आयोग,शालेय साहित्य, अंगनवाडी तसेच कोरोना काळातील उपाय योजना मध्ये सरपंच,ग्रामसेवक व तत्कालीन गटविकास अधिकारी यांनी संगणमत करून लाखो रुपयाचा निधी हडप केला आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की पाटोदा तालुक्यातील येवलवाडी ग्रामपंचायत मध्ये अंगणवाडीसाठी वॉटर फिल्टर स्वच्छालय व इतर खेळणी साहित्य पुर्ण रित्या बोगस दर्शवुन निधीचा अपहार केला तसेच ग्रामपंचायत व शाळेसाठी कसल्याही प्रकारच्या वस्तू न खरेदी करता निधी उचला आहे व जिल्हा परिषद शाळेची दुरुस्ती व नळ कनेक्शनच्या नावाखाली पैसे काढले असून गावांमधील पहिले अस्तित्वात असलेल्या नाली व रस्ता दाखवून त्यावर मुरूम टाकून बोगस बिले काढण्यात आली तर 2018 या वर्षी शंभर रुपये किमतीचे एलईडी बल्ब बसवून तेच सलग चार वर्षे दाखवत बिल उचलन्याचा प्रताप येवलवाडी ग्रामपंचायतने केला असून 2017 मधील घरपट्टी ही हाडप करून कोरोना काळात बोगस फवारणी व इतर उपाय योजना नियमाप्रमाणे न करता त्यामध्ये ही पैसे खाण्याचे काम यांनी केले आहे तर शोष खड्डे गावातील लोकांनीच स्वखर्चानी केली आहे त्यावर देखील ग्रामपंचायत ने बोगस बिल काढले आहेत संगणक बंद असताना नेटच्या नेटच्या रिचार्ज व पाईप लाईन लिकेज गाव अंतर्गत बोगस रस्ते दाखवून तर ग्रामपंचायत इमारत दुरुस्ती तसेच गावात आडर ग्राउंड एकही सिमेंट नाली नसताना इत्यादी कामे दाखवून सरपंच ग्रामसेवक व तत्कालीन गटविकास अधिकारी यांनी येवलवाडी ग्रामपंचायत लुटून खाल्ली असल्यामुळे या सर्व कामाची चौकशी करून संबंधितावर कारवाई करावी अशी मागणी युवानेते किशोर नागरगोजे यांनी गटविकास अधिकारी पाटोदा यांच्या मार्फत निवेदणाद्वारे ग्रामविकास मंत्री,आयुक्त कार्यालय औरंगाबाद, मुख्य अधिकारी जिल्हा परिषद बीड यांना किशोर नागरगोजे यांनी मागणी केली आहे