बीड-आदर्श शिक्षण संस्था,बीड संचलित-शिवणी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात दि.04/10/2022 रोजी लोकनेत्या_स्व.सौ.केशरबाई (काकू) क्षीरसागर यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली.औरंगाबाद विभागाचे शिक्षक आमदार आदरणीय श्री.विक्रमजी काळे,श्री.रामनाथ डाके सर,श्री.माञे सर,श्री.खोड सर,श्री.लांडे पाटिल सर,विद्यालयाचे प्राचार्य_श्री.येडे व्ही.बी. यांनी स्व.काकू व नाना यांच्या प्रतिमाचे पुजन करुन विनम्र अभिवादन केले.विद्यालयाचे प्राचार्य_श्री.येडे व्ही.बी.यांनी शिक्षक आमदार श्री.विक्रमजी काळे यांचे शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.कार्यक्रमास उपस्थित असलेले श्री.डाके सर,श्री.माञे सर,खोड सर,श्री.लांडे पाटिल सर यांचे विद्यालयाच्यावतीने शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले.

विद्यालयातील विद्यार्थी कु.बजगुडे तृप्ती,काकडे श्रद्धा,ढास सुचिता,घोडके पुजा व चि.वैद्य स्वप्निल यांनी आपले मनोगत व्यक्त केले.विद्यालयातील शिक्षक श्री.शेख सर,श्री.राऊत सर,श्री.ढास सर यांनी स्व.काकूंच्या कार्यावर आपले मनोगत व्यक्त केले.विद्यालयाचे प्राचार्य_श्री.येडे व्ही.बी.यांनी स्व.काकूच्या राजकीय,सामाजिक,शैक्षणिक व सहकार इ.विविध क्षेञातील कार्यावर प्रकाश टाकला.

शिक्षक आमदार श्री.विक्रमजी काळे यांनी स्व.सौ.केशरबाई क्षीरसागर यांच्या राजकीय,सामाजिक,शैक्षणिक व सहकार क्षेञामधील कार्याविषयी विद्यार्थ्यांना अमुल्य मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रास्तविक,सुञसंचलन व आभार श्री.ढास जे.एम.यांनी मानले.यावेळी विद्यालयातील सर्व प्राध्यापक,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगिताने करण्यात आली.