कळमनुरी तालुक्यातील वारंगा फाटा या ठिकाणी एका सरपंचाला पोल्ट्रीफार्म टाकण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी 30 हजाराची लाच स्वीकारणे चांगलेच महागात पडले आहे. लाचलुचपात प्रतिबंधक विभागाचे उपाधीक्षक निलेश सुरडकर,पोलीस निरीक्षक विजय पवार यांच्या पथकाने आज दुपारी वारंगा फाटा येथील एका कृषी केंद्रामध्ये सापळा रचून सरपंच ओम कदम यांना 30 हजार रुपयाची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले आहे. नांदेड येथील एका व्यक्तीस वारंगा फाटा शिवारामध्ये पोल्ट्री फार्म उभारण्यासाठी ग्रामपंचायतीचे ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक होते त्यामुळे तक्रारदाराने वारंगा फाटा येथील सरपंच ओम कदम यांच्याकडे ना हरकत प्रमाणपत्राची मागणी केली असता त्यांना सरपंच कदम यांनी 30 हजाराची मागणी केली होती.तेव्हा या प्रकरणातील तक्रारदाराने लाचलुचपात प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार केली होती.त्यावरून ही कारवाई करण्यात आली असून याप्रकरणी आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Sponsored

महावीर कुल्फी सेन्टर - बूंदी

महावीर कुल्फी सेन्टर की और से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं