स्पंदन घेणार दहा गरजू मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी

Sponsored

ओम धगाल - पूर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा

ओम धगाल की और से हिंडोली विधानसभा क्षेत्र एवं बूंदी जिले वासियों को रौशनी के त्यौहार दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

स्पंदन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. शरद लांडगे यांची माहिती

( तळेगाव ढमढेरे प्रतिनिधी ) नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असताना स्पंदन वैद्यकीय सामाजिक संस्थेच्या वतीने वेलकम द बेबी गर्ल उपक्रम राबवत नवरात्रीमध्ये नवजात मुलींना साहित्य देत मुलींच्या मातांचा सन्मान करण्यात येत असून स्पंदनच्या वतीने दहा गरजू मुलींना प्रतिमहिना दोन हजार रुपयांची मदत करण्यात येणार असल्याचे स्पंदन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. शरद लांडगे यांनी सांगितले.

           पुणे नगर महामार्गावर कार्यरत असलेल्या स्पंदन मेडिकल असोसिएशन व तळेगाव ढमढेरे प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या वतीने शासनाच्या वतीने राबविण्यात आलेल्या माता सुरक्षित तर घर सुरक्षित या योजनेअंतर्गत महिला व गर्भवती महिलांना श्री रोग तज्ञ डॉ. शरद लांडगे यांनी मार्गदर्शन केले, यावेळी स्पंदन वैद्यकीय सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. रामदास देवखिळे, डॉ. ज्योती खाडे, डॉ. हिरामण तरकुंडे, डॉ. दिनेश भोर, तळेगाव ढमढेरे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. संध्या कारंडे, डॉ. वर्षा गायकवाड, आरोग्य सेविका रुपाली मोरे, सरपंच अंकिता भुजबळ, उपसरपंच मच्छिंद्र भुजबळ यांसह आदी उपस्थित होते. तर यावेळी बोलताना सध्या मुलींच्या जन्माचे अनेक ठिकाणी स्वागत करण्यात येत असल्याची बाब कौतुकास्पद आहे, तसेच स्पंदन नेहमी सामाजिक उपक्रमे राबवत असताना आता गरजू दहा मुलींना प्रत्येक महिन्याला शिक्षणासाठी दोन हजार रुपयांची मदत स्पंदनच्या वतीने करण्याचा निर्णय घेतल्याचे स्पंदन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. शरद लांडगे यांनी सांगितले.