साेलापूर- शहरातील एका मुलानं आपल्या आईवर जीवघेणा हल्ला केला.या हल्ल्यानंतर नातेवाईकांनी संबंधित महिलेस तातडीने रुग्णालयात दाखल केले. मृत्यूशी झुंज देणा-या महिलेचा मूलगा हा मनाेरुग्ण असल्याची माहिती मिळाली आहे.
लॉकडाऊनचा फटका अनेकांना बसला आहे. लॉकडाऊनमुळे सोलापूर शहरातील इंजिनिअर असलेला सुफीयान शेख हा मानसिक रोगी झाला होता. बुधवारी
त्याने जन्मदाती आई जरीना अस्लम शेख यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. घरात ठेवलेल्या चाकुने तब्बल तीन वार करत त्याने आईला भोकसलं. नातेवाईकांनी ताबडतोब जखमी जरीना यांना सोलापुरातील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेे. जरीना या शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागात मृत्यूशी झुंज देत आहे.
जरीना या घरात सकाळी रोजच्या प्रमाणे झाडू मारत होत्या. सुफीयान हा आईवर अज्ञात कारणावरून चिडून होता. घरात कोणी नसल्याची संधी साधत त्याने घरातील चाकु घेतले आणि पाठीमागून येत आईवर जीवघेणा हल्ला केला. मानेवर,पाठीवर आणि कंबरेवर असे तीन वेळा त्याने आईला चाकूने भोकसलं आणि तेथून पळ काढला. त्यानंतर तो स्वतः जेलरोड पोलीस ठाण्यात हजर झाला.
दरम्यान सुफीयानने मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केल आहे. पण गेल्या दोन वर्षांपासून तो मानसिक त्रासाने ग्रस्त होता. आईने सुफीयानला सोलापूर आणि पुणे येथील प्रसिद्ध अशा मनोरुग्ण डॉक्टरांकडे दाखवले होते. त्यावर उपचार देखील सुरू होते.