महाराष्ट्र राज्य साक्षर भारत प्रेरक व प्रेरिका समन्वयक संघ बीड यांच्या वतीने बीड जिल्हा परिषद कार्यालयासमोर अमरण उपोषण चालू आहे,

या मध्ये त्यांच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की प्रेरक प्रेरिका व समन्वयक यांचे थकीत मानधन तात्काळ देण्यात यावे, नव साक्षर योजनेमध्ये प्रेरक समन्वयक यांना नियुक्ती आदेश देण्यात यावे ,सन 2015 व 16 यावर्षी प्रेरक प्रेरिका यांनी कुटुंब सर्वेक्षणाची रक्कम तात्काळ देण्यात यावी, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार एक जानेवारी 2016 पासून समान काम समान वेतन लागू करण्यात यावे, अशा विविध मागण्यासाठी त्यांनी आमरण उपोषण करण्यात आले आहे.