संगमेश्वर : तालुक्यातील नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने लीटिल एन्जल्स प्री स्कुलच्या वतीने दांडिया महोत्सवाचे आयोजन करण्यात‎ आले होते. या कार्यक्रमामध्ये मुलांसमवेत पालकवर्गाने ही मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. 

Sponsored

महावीर कुल्फी सेन्टर - बूंदी

महावीर कुल्फी सेन्टर की और से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

विदयार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्याकरीता लीटिल एन्जल्स प्री स्कुलच्या मुख्याध्यापक सौ. नूतन खातू यांच्या मार्गदर्शनाखाली अमृत महोत्सवानिमित दहिहंडी, रक्षाबंधन असे विविध कार्यक्रम घेण्यात आले. नवरात्रोत्सवाचे औचित्य साधत दांडीया महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी‎ शाळेतील छोटे बाल कलाकार रंगीबेरंगी ड्रेस परिधान करून शाळेत दांडीया खेळण्यासाठी दाखल झाले होते.

दांडीया महोत्सवाच्या कार्यक्रमाध्ये मुलांसमवेत पालकवर्गाने ही टीपऱ्यांच्या ठेक्यावर मनमुराद आनंद लुटत उत्स्फूर्तपणे‎ आपला सहभाग नोंदवला. तसेच वत्कृत्व स्पर्धा, रंगभरण स्पर्धा, गीत गायन स्पर्धा ही घेण्यात आल्या. 

या कार्यक्रमामध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मुख्याध्यापक सौ. नूतन खातू , सौ. निकिता शेट्ये, कु· स्नेहल चव्हाण , सौ. साक्षी खातू, सौ. माधवी शिंदे आदींनी सहभाग घेतला.