लातूर : जिल्ह्यातील वलांडी गावातून नांदेड गुलबर्गा राज्य मार्ग गेले आहे त्या राज्य मार्गावर खूप मोठ्या प्रमाणे अतिक्रमण झाले आहे मोठमोठे इमारती बांधकाम करण्यात आले आहे सदरचे रोड शंभर फुटाचा असून दोन्ही बाजूने अतिक्रमण झाल्यामुळे रस्ता एवढा लहान झाला आहे की एक गाडी गेली तर दुसरी गाडी पास होत नाही वलांडी बाजारपेठ हे खूप मोठे असल्यामुळे या अतिक्रमणामुळे वलांडी गावातील व परिसरातील जनतेला अडचणीचा सामना करावा लागत आहे व तसेच लांबोटा तोगरी राज्य महामार्ग क्रमांक 238 चे रुंदीकरणाचे व मजबुतीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग मार्फत सुरू आहे या रस्त्याच्या दोन्ही बाजूने ठिकठिकाणी अतिक्रमण झाले आहेत या अतिक्रमणामुळे महामार्गावर जाणाऱ्या वाहन चालकास फार अडचणीचा सामना करावा लागत आहे वलांडी जवळ जागृती साखर कारखाना असल्यामुळे कारखान्याच्या गाड्या नेहमीच जात असतात त्या गाड्यांना अतिक्रमणाचा त्रास होतो व अनेक वेळा वलांडी बस स्थानकावर अतिक्रमण वाढल्यामुळे उसाच्या गाड्या रोडवर पलटी झाल्या आहेत त्यामुळे राज्य मार्गावरील अतिक्रमण तात्काळ हटवावे. तसेच निलंगा सार्वजनिक बांधकाम विभाग कडून वलांडी येथील काही दुकानदारांना अतिक्रमण केले आहे म्हणून नोटीसा देण्यात आल्या आहेत परंतु जे सरकारी दवाखान्यासमोर शेड मारले आहेत ते स्वतःच्या मालकी जागेत मारलेले आहेत ज्या दुकानदारांना सार्वजनिक बांधकाम विभाग मार्फत नोटीस देण्यात आली आहे ते दुकान रोड व नालीच्या पलीकडे पाच फुटावर दुकाने आहेत सध्या स्थितीला राज्यमार्गावर जे खरोखर अतिक्रमण केले आहेत त्यांना नोटिसां न देता जे नालीच्या पलीकडे आहेत त्यांना सार्वजनिक बांधकाम विभाग मार्फत नोटीस देण्यात आली आहे या रस्त्याची न्यायालयात सदर शेतकऱ्यांनी याचिका दाखल केली असून सदर प्रकरण न्यायप्रविष्ठ असतानाही सार्वजनिक बांधकाम विभाग मार्फत धन दांडग्या मोठ्या अतिक्रमण धारकांना अभय देऊन मालकीच्या जागेवर ज्यांनी दुकाने पत्राची शेड बांधले आहेत त्यांना नोटीसा देऊन सार्वजनिक बांधकाम विभागाचा दुटप्पी भूमिका आहे व सार्वजनिक बांधकाम विभाग मार्फत न्यायालयाच्या अवमान होत आहे सदर बाबीची अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता यांनी जातीने लक्ष घालून नांदेड गुलबर्गा राज्य मार्ग व लांबोटा तोगरी महामार्ग याची स्थळ पाहणी करून न्याय देण्यात यावा अन्यथा जर गोरगरिबावर अन्याय होत असेल तर त्या अन्याया विरुद्ध अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीच्या वतीने अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग लातूर येथे बेमुदत आमरण उपोषण करणार अशी तक्रार सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हाधिकारी व उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आले.यावेळी संस्थापक अध्यक्ष सौदागर महमदरफी, जिल्हा कार्याध्यक्ष अहमद तांबोळी, निलंगा तालुकाध्यक्ष सुनील काळे, तालुका सोशल मीडिया प्रमुख द्रोणाचार्य कोळी, ऑल इंडिया पॅंथर सेना जिल्हाध्यक्ष प्रदीप थोरात, शाखाध्यक्ष सगीर मोमीन, पत्रकार साजिद पटेल, अफसर शेख, कासिम जमीनदार,  तानाजी भंडे, फकीर सौदागर व इतर पदाधिकारी निवेदन देताना उपस्थित होते