त्या पाटेगाव पुलावरुन गोदापात्रात उडी मारून आत्महत्या करणाऱ्या युवकांचा चौथ्या दिवशी मृत्यूदेह सापडला...
"पैठण तालुक्यातिल वडवळी शिवारात सापडला मृत्यूदेह"
पैठण/ चार दिवसापूर्वी पाटेगावजवळील गोदावरी नदीच्या पात्रावरील पुलावरुन एका युवकाने पाण्यात उडी मारून आत्महत्या केल्याची ही घटना शनिवारी सायंकाळी पाटेगाव घडली होती.प्रविण भगवान पवार (३५)असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे.
या युवकांने पाटेगावच्या पुलावरुन गोदापात्रात उडी मारली असल्याचे काही नागरिकांनी पाहिल्यानंतर सरपंच गोकुळ रावस यांनी सदर घटनेची माहिती पोलिसांनी दिली. पो.नि. किशोर पवार यांनी तत्काळ पथकासह घटनास्थळी धाव घेऊन शोधकार्य सुरु केले होते चौथ्या दिवशी सकाळी (दि.२)रोजी या युवकांचा मृत्यूदेह पैठण तालुक्यातिल वडवळी शिवारात सापडला आहे.
सध्या जायकवाडी धरणातून गोदावरी पात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याने गोदावरी नदी दुधडी भरून वाहत आहे. त्यामुळे रात्रीच्याशोध घेण्यासाठी औरंगाबाद महानगरपालिका बचाव पथक व पैठण नगर परिषदेचे अग्निशमन दलाचे जवान पात्रात बोटीने शर्तीचे प्रयत्न करीत होते. घटनास्थळी पैठणचे तहसीलदार दत्तात्रय निलावाड, पो. नि. किशोर पवार यांनी भेट देऊन पथकाला सूचना केल्या.मात्र लगातार तीन दिवस शोधमोहिम सुरुच होती,आज सकाळी (दि.१)आँगष्ट रोजी सकाळी साडे आठ ते नऊच्या दरम्यान वडवळी येथील नदीपात्रात एका झुडपात आढळलेला युवकाचा मृतदेह सापडून आला.सदर मृतदेहाचा शोध पैठण नगरपालिका आपत्ती व्यवस्थापन ची पथक तसेच औरंगाबाद मनपाचे रेस्क्यू टीम आणि महसूल चे पथक तसेच पोलीस प्रशासनाचे पथक यांनी तीन दिवसापासून शोध मोहीम करून सदर मृतदेह सापडून आला आहे. सदर मृतदेह बोटीतून वडवाळी येथील स्मशान भूमीत काढून ॲम्बुलन्स द्वारे पुढील योग्य त्या प्रक्रियेसाठी सरकारी रुग्णालय पैठण येथे पाठविण्यात आला आहे.