रत्नागिरी: भाजप जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन, ओबीसी मोर्च्याचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप कुंभार, जिल्हाध्यक्ष अभिजीत शेट्ये यांनी दक्षिण रत्नागिरी जिल्ह्याची कार्यकारिणी जाहीर केली आहे.
ओबीसी मोर्च्याच्या जिल्हाध्यक्षपदी अभिजीत शेट्ये यांचीच निवड करण्यात आली आहे. उपाध्यक्षपदी हरिश्चंद्र शिवगण, धाकटा पाजवे, विश्वनाथ गुरव, महेश मेस्त्री, विजय कोकाटे, मनोहर दळी, संदीप रसाळ, विजय मायंगडे, कृष्णा मोरे, संघटन सरचिटणीसपदी रत्नागिरीचे माजी नगरसेवक राजेश तोडणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चिटणीसपदी प्रितेश धामणसकर, मयुर आग्रे, ऋषिकेश सुवारे, अमोल पांचाळ यांची निवड करण्यात आली आहे. महिला जिल्हाध्यक्षपदी रत्नागिरीच्या सौ. प्राजक्ता रूमडे, युवक अध्यक्षपदी रत्नागिरीचे दादा ढेकणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदस्यपदी प्रवीण खेडेकर, आत्माराम करंबेळे, शशिकांत तरळ, रणजित मोर्ये, प्रकाश घवाळी, कौशल मोरे, फैयाज नडेकर, प्रवीण रायकर, भरत भुवड यांची निवड करण्यात आली आहे. रत्नागिरी, संगमेश्वर, लांजा, राजापूर तालुक्यातील पदाधिकारी, सदस्यांचा जिल्हा कार्यकारिणीत समावेश करण्यात आला आहे. नूतन पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी भाजप ओबीसी मोर्च्याची संघटनात्मक बांधणी करावी असे आवाहन जिल्हाध्यक्ष अभिजीत शेट्ये यांनी केले आहे.