संगमेश्वर : तालुक्यातील आंबव पोंक्षे गावचे प्रतिष्ठित नागरिक, कुणबी ग्राम शाखेचे अध्यक्ष मा. श्री कृष्णा धुळप हे मुंबई सार्वजनिक बांधकाम शाखा अभियंता पदावरून सेवानिवृत्त झाले.तसेच सा.बा. मधील गणपत भुवड हे ही सेवानिवृत्त झाले होते. या दोघांचा ६५ वा वाढदिवस त्यांनी त्यांच्या शेतात लागवड केलेला चिबुड कापून साजरा करण्यात आला.
सार्वजनिक बांधकाम मधून सेवानिवृत्त झाल्यानंतर सेवाभावी समाजकार्य करत या दोघांनी शेती करण्यावरच भर दिला होता. श्री गणपत भुवड यांनी आपल्या वडिलोपार्जित जागेत सिंचन विहिरी खोदून आंबा, काजूची लागवड केली, तसेच आधुनिक पध्दतीने उन्हाळ्यात वेगवेगळ्या प्रकारची भाजीपाला लागवड करून शेतीतून उत्पन्न घेतले. त्यामुळे गावातील अनेक महिलांच्या हातांना काम मिळाले, बाजारातून विकत केक आणून कापण्यापेक्षा, आपल्या शेतातील पिकवलेला चिबूड कापून वाढदिवस साजरा केल्याने गावात खूपच कुतूहलाचा विषय झाला होता. असा हा आगळावेगळा ६५ वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसासाठी उपस्थित लोकांना स्नेह भोजन देण्यात आले .
या कार्यक्रमाला बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष सुरेशजी भायजे, माजी सरपंच दीपक शिगवण, तंटामुक्त समिती अध्यक्ष राजाराम जुवळे ,विलास मांडवकर ,सुरेश जुवळे, दीपक बोले, शांताराम घडशी, नारायण बोले,सचिन हेमण,सोमा भायजे,गोविंद गोटेकर,आदी ग्रामस्थ उपस्थित होते.