चिपळूण : आगार व्यवस्थापक मंडळाकडून परळ चिपळूण परळ बस सेवा 1 ऑक्टोबर पासून सुरू झाली असून ही बस दादर, कुर्ला, मैत्री पार्क, कोकण भवन, पनवेल, माणगाव, महाड, विन्हेरे, तुळशी, भरणा नाका, लोटे मार्गे जाईल. सदर परळ वरून सकाळी 5.15 वाजता, तर चिपळूण वरून 16.30 वाजता सुटेल.
सदर बसचे आरक्षण ऑनलाईन, बस स्थानक व आगारमध्ये उपलब्ध आहे. ऑनलाईन आरक्षण करण्यासाठी https://public.msrtcors.com ह्या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. तरी या बस सेवेचा प्रवाशांनी लाभ घ्यावा असे परळ आगार, मुंबई विभाग (संपर्क : 022 - 24229905) यांनी कळविले आहे.