हत्ता नाईक येथे शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी,एका विरुद्ध गुन्ह्याची नोंद.
या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार हिंगोली जिल्ह्याच्या सेनगांव तालुक्यातील हता नाईक गावामध्ये ज्ञानेश्वर रंगनाथ कांबळे यांना तुझ्या आईने रस्त्या जवळील माती का नेली असे म्हणून त्यांना शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली तसेच साक्षीदारांना देखील शिवीगाळ करून थापड बुक्क्यांनी मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिल्याने सेनंगाव पोलिसात एका विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून सदरील प्रकरणाचा पुढील तपास सेनगांव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणजीत भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस जाधव हे करत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे