औरंगाबाद: १ऑक्टोबर पासून देशातल्या 13 शहरामध्ये 5G सेवेचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आला.आज औरंगाबाद शहरातल्या जालना रोडवरील पंचतारांकित हॉटेलमध्ये चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज ॲण्ड ॲग्रिकल्चर असोसिएशन (सीएमआयए)च्या वतीने सोमवारी 'डेस्टिनेशन मराठवाडा' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्य अतिथी म्हणून केंद्रीय मंत्री वैष्णव म्हणाले की, पंतप्रधानांनी दिलेल्या 'टार्गेट'मुळे आपल्या अभियंत्यांनी फोर जी, फाईव्ह जी तंत्रज्ञान विकसित केले. पहिल्या टप्प्यात १३ शहरांमध्ये फाईव्ह जी सेवा सुरू झाली. दुसऱ्या टप्प्यात ३१ मार्च २०२३पर्यंत २०० शहरांमध्ये फाईव्ह जी सेवेला सुरूवात होणार असून, यात औरंगाबादचा समावेश आहे. ऑरिकसह येथील उद्योगांच्या क्षमतेचा विचार करून देशात येणाऱ्या उद्योगांना ऑरिक एक चांगला पर्याय आहे. उत्सव माछर यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमासाठी सीएमआयए सचिव अर्पित सावे, उपाध्यक्ष दुष्यंत पाटील, सौरव भोगले, अथर्वेशराज नंदावत यांनी पुढाकार घेतला.यावेळी व्यासपीठावर केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, औरंगाबादचे पालकमंत्री तथा राज्याचे रोहयो आणि फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, सहकारमंत्री अतुल सावे यांची उपस्थिती होती. 'लोकमत'चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा, माजी खासदार राजकुमार धूत, उद्योजक एन. के. गुप्ता, राम भोगले, मसिआचे अध्यक्ष किरण जगताप यांच्यासह विविध उद्योजक, सीएमआयए, मसिआ आणि जिल्हा व्यापारी महासंघ, इंडस्ट्रियल सप्लायर्स असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
પોરબંદર મા ઓપન ગુજરાત રંગસંગ 2022 રાસોત્સવનુ ભવ્ય આયોજન લાભ લેવા આમંત્રણ.
પોરબંદર મા ઓપન ગુજરાત રંગસંગ 2022 રાસોત્સવનુ ભવ્ય આયોજન લાભ લેવા આમંત્રણ.
वडगावातील प्रतिष्ठीतांच्या जुगार अड्ड्यावर अवधुवातडी पोलिसांची धाड ; 17 जुगारीकडून सव्वा चार लाखांचा मुद्देमाल जप्त
यवतमाळ : प्रतिष्ठीतांच्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून 17 जणांना ताब्यात घेण्यात आले. ...
पत्नी की हत्या के आरोपी पुलिस गिरफ्त में
डिंडोरी जिले के शाहपुरा थाना अंतर्गत ग्राम कोहानि देवरी मैं पुलिस ने अंधी हत्या कांड का खुलासा...
'दूसरे मंत्रालयों के बोझ में दबे हैं रेल मंत्री', कपिल सिब्बल ने ओडिशा हादसे पर केंद्र सरकार को घेरा
नई दिल्ली, Odisha Train Accident राज्यसभा सांसद कपिल सिब्बल ने ओडिशा में रेल हादसे को...