इतर मागास बहुजन कल्याण विभाग अंतर्गत चालविण्यात येत असलेल्या कै पं शामाप्रसाद मुखर्जी शिक्षण संस्था धारूर संचलित ,वसंतराव भागवत आश्रम शाळा सोनीमोहा येथे दिनांक 2 ऑक्टोंबर 2022 वार रविवारी रोजी महात्मा गांधी जयंती निमित्त पालक मेळावा ,व माजी विद्यार्थी मेळावा घेण्यात आला आहे ,
यावेळी दीप प्रज्वलाने कार्यक्रमाची सुरुवात झाली, त्यावेळी प्रमुख पाहुणे शशिकांत गव्हाणे, गटकळ रमेश सर ,सुमंतराव डुबे ,दीपक राव डुबे ,संजय तोंडे ,माणिक चव्हाण इ. मान्यवर ऊपस्थित होते.या प्रसंगी गटकळ सर, यांनी आपल्या मार्गदर्शनात मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा, शाळेतील शिक्षक व पालक या तिन्ही घटकांची सांगड घातली तर सर्वांगीण विकास होऊ शकतो असे सांगितले.
मा. शशिकांतजी गव्हाणे यांनी माजी विद्यार्थ्यांना शाळेसाठी कशाप्रकारे योगदान देणे आवश्यक आहे ,ते सांगितले व माजी विद्यार्थी यांना दिशा देण्याचे काम केले. मा.माणिकराव चव्हाण यांनी पालकांनी शाळा आणि विद्यार्थी यांच्या मध्ये अडथळे निर्माण न करता मुलांच्या विकासासाठी शाळेतील सूचना पाळण्याचे काम पालकांनी करावे असे सांगितले.श्री सुमंतराव डुबे यांनी प्रास्ताविक केले. शाळेचे सूत्रसंचालन श्री वाघमारे प्रशांत सर व श्री चव्हाण राजेंद्र सर यांनी केले आहे दुपारच्या सत्रात शेर श्री बंडुजी खराटे यांनी शाळेवरील पोवाडा सादर करून तो युट्युब ला प्रसारित केला सायंकाळच्या सत्रात सांस्कृतिक कार्यक्रम साजरा करण्यात आला यात शेतकरी आत्महत्या, देवीची गाणी, हिंदी गाणे, विनोदी गीत, कोळी गीत असा भारदार कार्यक्रम घेण्यात आला पालकांची अलोट गर्दी व तुफान प्रतिसाद पाहवयास मिळाला. शाळेचे मुख्याध्यापक श्री.प्रदिप कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमासाठी शाळेतील सहशिक्षक श्री मुंडे सर ,वाघमारे सर, चव्हाण सर ,श्रीमती मॅडम दाजी ,यांनी तसेच वस्तीग्रह अधिक्षक यादव सर व चतुर्थश्रेणी कर्मचारी पेटकर मावशी व श्रीमती मनेरी ताई श्री राऊत व भालेराव यांनी प्रचंड मेहनत घेतली...