परभणी (प्रतिनिधी)नवरात्रीच्या सातव्यामाळेनिमित्त रविवारी (दि.2) मांडाखळी येथे इंद्रायणी देवीयात्रेस आलेल्या भाविकांना महाप्रसाद देण्यात आला. ज्ञानसाधना प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.किरण सोनटक्के व ग्रामपंचायत मांडाखळी यांच्या वतीने महाप्रसाद, चहा व पाणी वाटपाची परंपरा मागील 20 वर्षापासून सुरु आहे. या सोहळ्याचे पहिले सत्र नवरात्रीच्या सातव्या माळेस व दुसरे सत्र कोजागिरी पौर्णिमेला असते. या दोन्ही सत्रामध्ये 50 ते 60 हजार भाविकांना महाप्रसाद दिला जातो.
यावर्षी नवरात्रीच्या सातव्या माळेच्या पहिल्या सत्रामध्ये महाप्रसादाचा असंख्य भक्तांनी लाभ घेतला. यावर्षी यात्रा रविवारची आल्याने प्रचंड संख्येने भाविक भक्त दर्शनासाठी आले होते. ज्ञानसाधना प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा.किरण सोनटक्के. सुयश सोनटक्के , राष्ट्रवादी विद्यार्थी युवक काँग्रेस आकाश कदम ,गजानन मुटकुळे, राजेश कदम, सरपंच नागेश शिराळ, उपसरपंच शेख मोहसीन,ग्रामपंचायत सदस्य रामकिसन शिराळ, परमेश्वर कने,बंटी पांचाळ, पंढरी गायकवाड, बाबुराव गायकवाड यांंच्यासह ग्रामस्थ मंडळी, प्रा. किरण सोनटक्के मित्रमंडळाचे पदाधिकारी, ज्ञानसाधना प्रतिष्ठानचे कर्मचारी, पंचक्रोशीतील मान्यवर या पुणवेळ सेवेसाठी उपस्थित होते.