औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांच्या घरासमोर विद्यार्थ्यांचा ठिय्या दहा वाजेनंतरची घटना वसतिगृहात सुविधांबाबत आश्वासन वसतिगृहातील कोणत्याही प्रकारच्या सुविधा मिळत नसल्यामुळे किलेअर्क येथील वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या देवगिरी या निवासस्थानासमोर रविवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास ठिय्या आंदोलन करीत घोषणाबाजी केली . जिल्हाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना सोमवारी वसतिगृहाला भेट घेत समस्या जाणून घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर विद्यार्थी वसतिगृहात परतले . शासकीय विद्यार्थ्यांना महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त किलेअर्क परिसरातील शासकीय विद्यार्थी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना एक वेळचे जेवण देण्यात आले . जेव्हा एक वेळचे जेवण असते . जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन केल्यानंतर वसतिगृहात परतलेले विद्यार्थी . तेव्हा जेवणात गोड पदार्थासह इतर वस्तू देण्यात येतात ; पण रविवारी असे घडले नाही . हेच विद्यार्थ्यांच्या संतापाचे कारण ठरले . रात्री दहा वाजेच्या सुमारास विद्यार्थी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या निवासस्थानासमोर पोहोचले . त्याठिकाणी जोरदार घोषणाबाजी केली . बेगमपुऱ्यासह इतर पोलीस ठाण्यांचे अधिकारी , कर्मचारीही घटनास्थळी पोहोचले . जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी बाहेर येऊन विद्यार्थ्यांची भेट घेतली . विद्यार्थ्यांची बाजू ऐकल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी वसतिगृहाला भेट देऊन सर्व पाहणी करण्याचे आश्वासन विद्यार्थ्यांना दिले . त्यामुळे विद्यार्थी वसतिगृहात परतले . या वसतिगृहात विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचे जेवण मिळते . पिण्यायोग्य पाणी उपलब्ध नाही . विजेची समस्या आहे