रत्नागिरी : शहरालगतच्या भगवती बंदर येथील कडेलोट पॉइंट येथून सुमारे दोनशे फूट खोल दरीत महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. मृतदेह दरीतून बाहेर काढण्याचे काम सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होते. मृतदेह नेमका कुणाचा याची ओळख पटविण्याचे काम सध्या सुरू आहे. घटना स्थळी पोलिस दाखल झाले आहेत. 

बेपत्ता तन्वी घाणेकर यांची दुचाकी देखील भगवती बंदर या ठिकाणी आढळून आली होती. या पार्श्वभूमीवर सापडलेला मृतदेह नेमका कुणाचा याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहेत. किल्ल्याच्या थेट समोर कडेलोट पॉइंट येथे दोनशे फूट दरीत हा मृतदेह सापडला. मृतदेहाचा चेहरा ओळखणे कठीण असून शरीरावरील कपड्यांनी ओळख पटविण्याचे काम सुरू होते.