कन्नड:भजनी मंडळाने केला भजनातून देवीचा जागर नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने आईचा जागर करण्यासाठी गेल्या ३६ वर्षापासून भावसार सखी महिला मंडळ विविध उपक्रम राबवतात . नवरात्रात प्रत्येकांच्या घरी जावून भजन आरती केली जाते . एवढेच नाहीतर पोर्णिमेला नवदूर्गांचे सादरीकरण केले जात असते . हीच परंपरा यंदाही कायम ठेवत भावसार सखी महिला मंडळाच्या वतीने भजन म्हणून भजनाच्या माध्यमातून देवीचा जागर केला . महिला मंडळाच्या वतीने नवरात्र उत्सवात श्रीसुप्तपाठाचे पारायणातून आईचे महत्व पटवून दिले . नवरात्रात एक दिवस रंगारगल्ली येथील हिंगुलांबिका मंदिरात भजन आणि यानंतर प्रत्येकांच्या घरी एक - एक दिवस भजन , आरतीचा यानंतर अष्टमीला होमवहन केला जाणार आहे . यासाठी मंडळाच्या अध्यक्षा ज्योत्स्ना भावसार , प्राजक्ता जोगे , स्मिता बोंबले , ज्योती भावसार , स्नेहा भावसार , संगीता गणोरे , संगीता भावसार , मंगला निशाने आदी महिला सहभाग घेतला