रत्नागिरी : तालुक्यातील मालगुंड येथील कवी केशवसुत स्मारक व्यवस्थापन समिती आणि ग्रामपंचायत मालगुंड यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी नेत्र तपासणी शिबिर रत्नागिरी येथील माळी चष्माघर यांचे विशेष सहकार्याने घेण्यात आले या शिबिराला मालगुंड पंचक्रोशीतील नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला. मालगुंड येथील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष तथा कवी केशवसुत स्मारक व्यवस्थापन समितीचे विद्यमान सदस्य राजेंद्र शिंदे व पत्रकार वैभव पवार यांच्या विशेष प्रयत्नातून व पुढाकाराने नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी या शिबिरामध्ये मालगुंड गावातील संबंधित नेत्र रुग्णांना आणि पंचक्रोशीतील नागरिकांना रत्नागिरीसारख्या मोठ्या शहरात जाऊन नेत्र विकारासंदर्भात असलेल्या उपचारां बाबत वेळ आणि जादा पैसा खर्च करावा लागतो मात्र ही आपल्या परिसरातील सर्वसामान्यांची गरज ओळखून आणि अत्यावश्यक बाब लक्षात घेऊन मालगुंडचे सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र शिंदे व त्यांचे सहकारी पत्रकार वैभव पवार यांनी विशेष पुढाकार घेऊन या शिबिराचा आपल्या स्थानिक ग्रामस्थांना लाभ मिळवून दिला.या शिबिरात माळी चष्माघर लायन्स हेल्थ सेंटरचे प्रमुख शरद माळी व त्यांचे सहाय्यक किरणराज यांनी सुमारे ५० रूग्णांची तपासणी करून एकूण १८ जणांना अल्प दरात चष्म्यांचे वाटप केले. सदर शिबिर यशस्वी करण्यासाठी प्रमुख संयोजक राजेंद्र शिंदे ,वैभव पवार, ग्रामपंचायत सदस्या सोनिया शिंदे ,अभय सुपेकर, बबन तांदळे ,डॉ.मधुरा जाधव,डॉ.दीपक थोरात,प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय पाटणकर मालगुंड केशवसुत स्मारकाचे कर्मचारी स्वप्नील राजवाडकर कुमार डांगे, अस्मिता दुर्गवळी, स्पृहा लिंगायत आदींनी विशेष मेहनत घेतली.