रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरील जबलपूर - कोईमतूर साप्ताहिक सुपरफास्ट एक्स्प्रेसला पश्चिम व मध्य रेल्वे प्रशासनाने मुदतवाढ दिली आहे.
त्यानुसार ७ ऑक्टोबरपासून ही एक्स्प्रेस दर शुक्रवारी जबलपूर येथून रात्री ११.५० वा. सुटून तिसऱ्या दिवशी सायंकाळी ५.१० वा. कोईमतूरला पोहचेल. परतीच्या प्रवासात दर सोमवारी कोईमतूर येथून दुपारी ३.२५ वा. सुटून तिसऱ्या दिवशी सकाळी ८.४५ वा. जबलपूरला पोहचेल. २३ डब्यांच्या या गाडीला कोकण मार्गावर पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, थिविम, मडगाव आदी स्थानकात थांबे आहेत.