बालविकास प्रकल्प अधिकारी चतुर्भुज

Sponsored

ओम धगाल - पूर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा

ओम धगाल की और से हिंडोली विधानसभा क्षेत्र एवं बूंदी जिले वासियों को रौशनी के त्यौहार दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

औरंगाबाद/ नेवासा येथील पंचायत समितीचा बालविकास प्रकल्प अधिकारी लाच प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला आहे. एक लाख १४ हजारांचे गाडी भाड्याचे बिल काढण्यासाठी त्याने तब्बल ५० हजारांची लाच मागितली होती. सोपान सदाशिव ढाकणे (३४, रा. प्लॉट नं ३४, रामविजय हौ. सोसायटी, अलोकनगर, बीड बायपास, औरंगाबाद) असे या लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नेवासा तालुक्यातील रास्तापूर येथील ४० वर्षीय व्यक्तीने या संदर्भात तक्रार दाखल केली होती. तक्रारदाराचे चारचाकी वाहन (कार) भाडेतत्त्वावर बालविकास प्रकल्प अधिकारी, पंचायत समिती नेवासा यांचेकडे लावण्यात आले होते. या वाहनाच्या भाड्यापोटी एक लाख १४ हजार २६१ रुपयांचे बिल येणे बाकी होते. हे बिल मंजूर करुन त्याचा चेक तक्रारदाराच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी तक्रारदाराला देताना ढाकणे याने ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.

तक्रारदारास लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने एसीबीकडे तक्रार नोंदविली. या तक्रारीची एसीबीने २३ जून रोजी पडताळणी केल्यावर त्यात तथ्य आढळले. त्यावेळी ढाकणे याने पंचासमक्ष तडजोड करून ४५ हजार रुपयांत फायनल होईल, असी स्पष्ट केले होते. हे सर्व पंचासमक्ष घडल्याने एसीबीने एक ऑगस्ट रोजी लोकसेवक सोपान ढाकणे याच्याविरोधात ४५ हजार रुपयांच्या लाच मागणीबद्दल नेवासा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. लगोलग त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले.एसीबीच्या नाशिक परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलिस अधीक्षक नारायण न्याहळदे, वाचक पोलिस उपअधीक्षक सतीश भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर एसीबीचे उपाधीक्षक हरीश खेडकर, पोलिस निरीक्षक शरद गोर्डे, अंमलदार वैभव पांढरे, बाबासाहेब कराड, चालक हवालदार हरुन शेख, राहुल डोळसे आदींनी ही कारवाई केली. या कारवाईसंदर्भात तातडीने महिला व बालकल्याण विभागाच्या सचिवांना माहिती देण्यात आली.