कंटेनर पलटी होऊन पाच जखमी..

"पैठण तालुक्यातिल आडगाव जावळे शिवारातील घटना"

पाचोड(विजय चिडे) धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर बिडच्या दिशेने जाणारा टँक्टर वाहातूक करणारा कंटेनर पैठण तालुक्यातिल आडगाव जावळे शिवारात (दि.२)रोजी नऊ वाजेच्या सुमारास पलटी होऊन पाच जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.

याविषयी सविस्तर माहिती अशी की,औरंगाबादहून-कर्नाटक ला छोटी ट्रँक्टर घेऊन जाणाऱ्या कंटेनरचे चालकांचे नियंत्रण सुटल्याने कंटेनर दुभाजकला धडकून पलटी झाले असून यात प्रभुलाल गुजार (वय ३५),रविलाल गुजार (वय ३२), हेमराज गुजार (वय३०),कन्नाराम गुजार (वय २६), विजय घनशाया देरवा (वय२८)हे पाचही जणं गंभीर जखमी झाले आहे. हा अपघात झाल्याचे स्थानिक नागरिकांच्या लक्षात आले असता त्यांची तात्काळ भोकरवाडी येथील टोलनाक्यावरील रूग्णवाहीकेला संपर्क करुन या अपघात झाल्याची माहिती दिली असता रूग्णावाहीका कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून जखमींना ताबडतोब औरंगाबाद येथील घाटी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. हे कंटेनर पलटी झाल्यानंतर बीड कडून-औरंगाबाद जाणारे सर्व वाहनांची तीन ते चार किलोमीटर अंतरावर रांगा लागल्या होत्या. रात्रीच्या वेळी ते कंनेटर बाजूला करता येत नसल्यामुळे पाचोड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून औरंगाबादहून-बीडकडे जाणारे वाहने व बीडहून औरंगाबाद जाणारे वाहने दोन्ही एकाच दिशेने सुरू करून रात्री दहा वाजता वाहतूक सुरूळीत केली.या घटनेची नोंद पाचोड पोलिस ठाण्यांत करण्यात आलेली असुन पुढील तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक गणेश सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार अण्णासाहेब गव्हाणे,पोलिस नाईक पवन चव्हाण हे करीत आहेत.