पतीस बार्शी पोलिसांनी केली अटक
सोलापूर :- हुंड्याच्या 50 हजार रूपयासाठी जावई व सासुकडून दिल्या जाणाऱ्या त्रासाला कंटाळून बार्शी येथील दोन मुलांसह विवाहितेने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची तक्रार मयत अनुराधा हिचे वडील दिलीप सोपान शिंदे यांनी बार्शी तालुका पोलीस ठाण्यात दिली आहे.
या प्रकरणी बाबासाहेब काशीद व छबाबाई काशीद यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणी संशयित आरोपी बाबा साहेब शिंदे यास अटक करून बार्शी न्यायालयापुढे हजर केले असता 4 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
बाबासाहेब काशीद याचे या पूर्वी लग्न झाले होते. त्याच्या पहिल्या पत्नीने दोन मुलींसह त्यांच्या कुसळंब येथील त्याच्या शेतातील विहिरीमध्ये आत्महत्या केली हे फिर्यादिस माहीत होते. त्यानंतर खडकोणी येथील दिलीप शिंदे यांची मुलगी अनुराधा हिचे लग्न 13 नोव्हेंबर 2019 रोजी बाबासाहेब काशीद याच्याशी झाला होता.