सोलापूर :- सोलापूर शहर हे देशात निर्माण होत असलेल्या नामांकित स्मार्ट सिटी शहरांच्या यादीत समाविष्ट शहर आहे.परंतु शहर स्मार्ट होण्या आधी शहरातील अत्यंत गजबजलेली वस्ती ही न्यू भैरू वस्ती आहे.या वस्तीत मोठ्या प्रमाणात कष्टकरी कामगार आणि झोपडपट्टीवासीय आहेत.यांना सोलापूर महानगरपालिका मार्फत नागरी सुविधा देण्याची जबाबदारी ही पालिका प्रशासनाची आहे.याबाबत वारंवार तक्रार करून ही प्रशासन याकडे कानाडोळा करताना दिसते.म्हणून लालबावटा बांधकाम कामगार युनियन सिटू च्या माध्यमातून पुढाकार घेऊन नागरी समस्या बाबत मा.आयुक्त पी.शिवशंकर यांना प्रत्यक्ष वस्तुस्थिती निवेदन व त्या भागातील छायाचित्रे दाखवून निदर्शनास आणून देताच तात्काळ ड्रेनेज सुरळीत करून नागरिकांना दिलासा मिळवून दिले.म्हणून नागरिकांच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करण्यात आल्याची माहिती युनियनचे नेते मारेप्पा फांदीलोलु यांनी दिली.
सोमवारी 29 ऑगस्ट रोजी सोलापूर महानगरपालिका प्रशासकीय कार्यालय जनता दरबार मध्ये लाल बावटा बांधकाम कामगार युनियन सिटू च्या वतीने नागरी सुविधा तात्काळ पुरविले याच्या प्रित्यर्थ आयुक्त पी.शिवशंकर यांच्या प्रति पुष्पगुच्छ देऊन कृतज्ञता व्यक्त केले.
यावेळी शंकर म्हेत्रे,सिद्राम म्हेत्रे,बजरंग गायकवाड, प्रेमनाथ गायकवाड, नितीन गुंजे, सिद्राम गायकवाड, धनराज गायकवाड, सुजित गायकवाड आदींची उपस्थिती होती.