रत्नागिरी : भारतीय जनता पार्टी (दक्षिण)रत्नागिरी सेवा समर्पण पंधरवडातंर्गत आज 2 ऑक्टोबर महात्मा गांधीजींच्या जयंतीनिमित्त भाट्ये समुद्र किनारी सुरूबन येथे 25 सुरुची रोपे लावण्यात आली. यावेळी द. रत्नागिरी जिल्हाध्यक्ष ॲड.दीपक पटवर्धन, राजेश सावंत, मुन्ना चवंडे, दादा ढेकणे, राजू कीर, राजन फाळके, राजन पटवर्धन, संदीप सुर्वे, लिलाधर भडकमकर, सुशिल भाटकर, संदीप रसाळ, राजू तोडणकर, राकेश भाटकर, सुप्रिया रसाळ, किरण नाईक, ग्रामपंचायत सदस्य रश्मी मॅडम आणि भाट्ये ग्रामस्थ उपस्थित होते.