*श्री संचारेश्वर प्राथमिक विद्यालय जिंतूर येथे महात्मा गांधीजी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी करण्यात आली.*

आज दिनांक २ आक्टोबर २०२२ रोजी श्री संचारेश्वर प्राथमिक विद्यालय जिंतूर येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करण्यात आले.

याप्रसंगी श्री शिवाजी सोमोसे यांनी प्रतिमा पूजन केले. सुत्रसंचलन श्री संजय गायकवाड यांनी तर बाळासाहेब ठोंबरे यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनचरित्रातील प्रेरणादायी प्रसंग सांगितले.

आभार श्री नंदकिशोर खंदारे यांनी व्यक्त केले.