रत्नागिरी : शहर परिसरातून एक विवाहिता बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे. २९ सप्टेंबर रोजी ही महिला शहरातील एका मोठ्या कंपनीत कामाला जाते असे सांगून घरातून बाहेर पडली. यानंतर ती घरी परतली नसल्याने पतीने रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांकडून महिलेचा शोध सुरू आहे. यामध्ये एक खळबळ उडवणारी घटना घडली आहे. या महिलेची दुचाकी भगवती बंदर परिसरात सापडली आहे. तन्वी घाणेकर ( रा . परटवणे रत्नागिरी ) असे बेपत्ता महिलेचे नाव आहे. आणि मोबाईल लोकेशन रत्नागिरी शहर परिसराच्या बाहेर सापडले आहे. 

सविस्तर वृत्त असे की, ही महिला एका कंपनीत कामाला गेली होती. मात्र दुसऱ्या दिवशी घरी जाणे अपेक्षित होते. तसे झाले नाही. मात्र सकाळी त्या घरी परतल्या नाहीत. या बाबत नातेवाईक मित्रपरिवाराकडे चौकशी करण्यात आली. मात्र त्या आढलून आल्या नाहीत. या बाबत रत्नागिरी शहर पोलिसांकडून तन्वी घाणेकर यांचा कसून तपास करण्यात येत आहे. दरम्यान पोलिसांकडून तन्वीसोबत काम करणारे कर्मचारी व नातेवाईक यांच्याकडे कसून चौकशी सुरु आहे.