जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय जादुटोणा विरोधी कायदा जनजागृती प्रचार आणि प्रसार कार्यक्रम अंमलबजावणी समितीमध्ये जिल्हा समन्वयक या पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.

इच्छुक उमेदवारांनी ४ ऑगस्ट पर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सामाजिक न्याय भवन, स.नं. १०४/१०५. विश्रांतवाडी रोड, पोलिस स्थानकासमोर, येरवडा, पुणे -६ या पत्यावर अर्ज करण्याचे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त संगिता डावखर यांनी केले आहे.