श्री क्षेत्र नगदेश्वर गड भाविकांनी फुलले

पैठण(विजय चिडे)गेवराई आगलावे गावापासून जवळच असलेल्या नगदेश्वर गडावर ( दि १ रोजी ) श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी परिसरातील भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. या गडावर महादेवाचे भव्य मंदिर असून याठिकाणी दरवर्षी भव्य यात्रा भरते.

आडूळसह कडेठाण,रजापूर,गेवराई,बालानगर,पा रुंडी,पारुंडी तांडा,दरेगाव, कचनेर,होनोबाची वाडी,खोडेगाव आदी गावातील भाविकांनी बाळ गोपाळसह पायी चालत जाऊन मनोभावे रांगेत उभे राहून 'हर हर महादेव,जय भोले' च्या जयघोषात शिस्ताईने दर्शन घेतले.तसेच पहाटे महाजलाभिषेक,पूजन,भजन असे विविध धार्मिक कार्यक्रम हि संपन्न झाले.गेवराई आगलावे गावातुन ते वर गडावर सकाळी महादेवाच्या मुकुटाची रथातुन वाजत गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली होती.वार्षिक यात्रेनिमित्त गडावर जाण्यासाठी परिसरातील सर्व रस्ते भाविकांनी फुलून गेले होते.श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी परंपरेनुसार याठिकाणी यात्रा भरते.यात्रेत दूरवरून डोंगर चढून पायी आलेल्या भाविकांसाठी आडूळ व गेवराई येथील युवकांतर्फे मोफत फराळ व जल पाणाची व्यवस्था करण्यात आली होती.पाचोड पोलीस ठाण्याचे सा पो नि गणेश सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार रविंद्र क्षीरसागर यांनी पोलीस बंदोबस्त ठेवला होता.विशेष म्हणजे परिसरातील गावातील असंख्य तरुण श्रद्धेने मागील कित्येक वर्षांपासून पैठण येथील गोदावरी नदीतील पाणी कावडीने पायी आणून येथील गडावरील महादेवाच्या पिंडीला जलाभिषेक घालतात.देवगांव येथील सुद्धा पंचमुखी महादेवाच्या मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.नगदेश्वर गडाचे अध्यक्ष नरहरी आगलावे व मठाधिपती महंत श्री परमेश्वर महाराज यांनी गडावर मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात येणार असल्याचे सांगितले.