रत्नागिरी : स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळाच्या (पावस, रत्नागिरी) वतीने रत्नागिरीतील अग्निहोत्र प्रचारक आणि कर्मयोगिनी श्रीमती विद्याताई पटवर्धन यांना स्वरूपयोगिनी पुरस्कार २०२२ प्रदान करण्यात आला.
स्वरूपानंद व्याख्यानमालेचे औचित्य साधून वरची आळी येथील अध्यात्म मंदिरात स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळाचे कार्याध्यक्ष जयंतराव देसाई यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन विद्याताईंचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला मंडळाच्या अध्यक्ष शिल्पाताई पटवर्धन, प्रमुख पाहुण्या व्याख्यात्या डॉ. विनीता तेलंग, कार्यवाह हृषिकेश पटवर्धन, विवेक भावे आदी उपस्थित होते
शनिवारी (दि. १) सायंकाळी हा कार्यक्रम झाला. या प्रसंगी साहित्यिक डॉ. सौ. विनीता तेलंग यांनी आदिशक्तिचे अवतरण या विषयावर बहुमोल व्याख्यान समाजातील एक प्रखर राष्ट्रवादी कर्तृत्ववान व्यक्तीमत्व म्हणून विद्याताई पटवर्धन सर्वत्र परिचित आहेत. त्यांनी राष्ट्र सेविका समिती, विश्व हिंदू परिषद इत्यादी माध्यमातून गेली ४० वर्षे सामाजिक सेवा केली आहे. त्या गेल्या ४० वर्षांपासून अग्निहोत्रीच्या उपासक आहे