डोंगर परिसरात गाड्या लावणे देखील जागा अपुरी पडू लागली
सातव्या माळ दर्शनासाठी राज्यसह परराज्यातून लाखो भाविक
महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या गेवराई तालुक्यातील तलवाडा येथील डोंगरावर वसलेल्या श्रीक्षेत्र त्वरितादेवी व यात्रा परिसरातील तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी सातव्या माळीचे औचित्य साधून भाविकांनी मोठया प्रमाणात गर्दी केली होती. लहान बालकांसह महिला-पुरूष व आबालवृद्धांच्या पहाटे तीन वाजेपासून ते रात्री दहा वाजेपर्यंत दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. भाविकांची हि मांदियाळी अक्षरशः डोळे दिपवणारी अशी होती. रविवारी सातव्या माळीला एक लाखापेक्षा अधिक भाविकांनी देवीचे दर्शन घेतले असावे असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
भाविक-भक्तांच्या नवसाला पावणारी देवी म्हणून त्वरितादेवी देवस्थान महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रसिद्ध आहे. त्यामुळेच दुरवरून हजारो भाविक या देवीच्या दर्शनासाठी येतात. या ठिकाणी नवरात्रोत्सव काळात भाविकांसाठी दररोज फराळाचे वाटप करण्यात येते. लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या या देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढत असल्याने देवस्थान परिसरात भक्तनिवास व इतर सोयीसुविधा शासनाने उपलब्ध कराव्यात अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत असून याकडे लोकप्रतिनिधी व प्रशासन दुर्लक्ष करत असल्याची चर्चा ऐकावयास मिळत आहे. या देवस्थानाला शासनाकडून तिर्थक्षेत्र विकासाचा "ब" दर्जा प्राप्त होऊन दहा वर्षे झाली पण अजूनही शासनाकडून विकास कामांसाठी दमडीही मिळालेली नाही. आतातरी गेवराई तालुक्याचे लोकप्रतिनिधी, खासदार, पालकमंत्री बीड तसेच प्रशासकीय अधिकारी व विश्वस्त मंडळाचे पदाधिकारी यांनी लक्ष देऊन महाराष्ट्र शासनाकडे पाठपुरावा करून देवस्थानच्या विकासासाठी निधी उपलब्ध करावा अशी अपेक्षा भाविकांनी व्यक्त केली आहे. या ठिकाणी नवरात्रोत्सव काळात पंधरा दिवस व चैत्र महिन्यात एक महिना यात्रा भरते. यात्रा काळात लाखो भाविक दर्शनासाठी येतात. परंतु पाहिजे तशा सोयीसुविधा उपलब्ध नसल्याने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची हेळसांड होत असून याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
तर रविवारचा सातव्या माळीचा दिवस अक्षरश आतापर्यंतच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकात रेकॉर्ड ब्रेक गर्दी डोंगर परिसरात पहावयास मिळत आहे तर गाडीसाठी जागा लावणे देखील वाहन चालकास मोठ्या अडचणीचे काम दिसून येत होते डोंगर परिसरात केलेल्या विद्युत रोषणाईमुळे डोंगर डोळ्याचे पारणे फेडणारा शन भाविक भक्त अनुभवताना दिसत आहे
चौकट
मादळमोहीच्या बजगुडे नामक व्यक्तीला यावर्षी विद्युत रोषनाई नाही साठी डोंगर परिसर व तुळजाभवानी मंदिर सजावटीचे काम दिले असून दरवर्षी देवी ट्रस्ट हे काम 60 ते 70 हजार रुपये मध्ये अशाच पद्धतीचे काम दिले जात असल्यामुळे यावर्षी तब्येत चार पट रक्कम दोन लाख 75 हजार रुपये हे काम दिल्यामुळे हवे तशी सजावट देखील दिसून येत नसल्यामुळे दरवर्षी असते अशीच दिसते त्यामुळे एवढी रक्कम सजावटीसाठी दिल्यामुळे भाविकांमधून ट्रस्ट विषय उलट सुलट चर्चा ऐकावयास मिळत आहे