वंचित बहुजन आघाडीला बदनाम करण्याचे षडयंत्र...

Sponsored

महावीर कुल्फी सेन्टर - बूंदी

महावीर कुल्फी सेन्टर की और से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

बीड (प्रतिनिधी) भारीप बहुजन महासंघ व वंचित बहुजन आघाडी हा ॲड.प्रकाश आंबेडकर यांचा प्रवास फार सुखकर नव्हता तो संघर्ष व स्वाभिमानाचा इतिहास आहे. अॅड. प्रकाश आंबेडकर यांना तडजोड कधी मान्यच नव्हती नसता ते सत्तेच्या सरीपाटात कधीच न्हाऊन निघाले असते. आठवले साहेब दररोज नहातात पण त्यांचे ते काय नवलच. ॲड.प्रकाश आंबेडकर यांनी घेतलेला स्टँड हा विचारपुर्वक असतो त्यावर टिका करण्याची कुवत भल्याभल्या राजकीय समिक्षकांकडे नसते म्हणुनच टि.व्ही. वाले अँकर ॲड.प्रकाश आंबेडकर यांना चँनलवर बोलवताना गृहपाठ करुनच येतात श्रद्धेय साहेबांची विचारधारा खूप व्यापक व वेगळी आहे परंतु त्या विचारधारेकडे मर्यादित बुद्धीने पाहणाऱ्याला काय समजेल.

बहुतेक राष्ट्रीय पक्ष व प्रादेशिक पक्षात गटबाजी आहे परंतु वंचित बहुजन आघाडीतील गटबाजीला खतपाणी घालून मोठे करण्याचे महापाप हे पक्ष सोडून गेलेल्यानी केले आहे. वंचित बहुजन आघाडीमध्ये ओबीसीवर अन्याय होत असल्याचा धादांत खोटा आरोप करत राज्य कार्यकरणीला व वंचित बहुजन आघाडी बदनाम करण्याचे षडयंत्र रचले आहे. "ज्याला शेजारी ओळखत नाही त्याची ओळख महाराष्ट्रात निर्माण करणारे एकमेव नेतृत्व म्हणजे ॲड. प्रकाश आंबेडकर साहेब आहेत".

वंचित बहुजन आघाडीमधून बाहेर पडणारी व्यक्ति अगोदर पक्षामध्ये मोठ्या मोठ्या पदावर काम करत होती. संधी दिल्यानंतर या लोकांनी कामे केली नाहीत, कुठलेही पक्षीय संघटन यांनी जोडले नाही, कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करत पक्ष जोडो नाही तर तोडोची भूमिका घेत फक्त स्वतःच्या नावापुरते वलय निर्माण केले होते ते गेल्याने पक्षाचे कसलेही नुकसान होणार नाही. ॲड.प्रकाश आंबेडकर यांनी याच नेत्यास त्यांच्या त्यांच्या समाजाचे मेळावे घेण्याचे सांगितले होते. वारंवार साहेबांनी या मेळाव्याच्या संदर्भात चर्चा करून पाठपुरावा केला. परंतु एकानेही मेळाव्याचे आयोजन केले नाही आणि आज हीच दळभद्री मंडळी पक्षाच्या बाहेर पडून पक्षावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.

महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये प्रस्थापित पक्षाने आज पर्यंत नात्यागोत्याच्या बाहेर राजकीय सत्तेचा वाटा जाऊ दिला नाही परंतु वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.प्रकाश आंबेडकर यांनी या महाराष्ट्रातील मायक्रो-ओबीसीला राजकीय न्याय मिळवून देण्यासाठी अथक परिश्रम केले. पैकी 2019 लोकसभा निवडणुकीत 48 पैकी 20 ते 25 जागी गरीब ओबीसी, मायक्रो-ओबीसी समूहातील लोकांना उमेदवाऱ्या दिल्या तसेच 2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीत 50 ते 60 जागी गरीब ओबीसींना त्यांच्या समूहाचे प्रश्न सोडविण्यासाठी उमेदवाऱ्या दिल्या मग वंचित बहुजन आघाडीमध्ये ओबीसींवर अन्याय कसा? असंख्य ओबीसी नेतृत्व वंचितच्या वाटेवर असताना त्यांची दिशाभूल करण्यासाठी ठरवून चालवलेले षडयंत्र आहे.

वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता या नात्याने पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांना जाहीर आवाहन करतो की, आपण ज्या पक्षांमध्ये गेला आहात त्या पक्षाकडून गरीब मायक्रो-ओबीसी, ओबीसी यांना उमेदवारी मिळवूनच दाखवाव्यात तर भर चौकात हार-तुरे देऊन तुमची पाठ थोपटेल. तुम्ही वंचित बहुजन आघाडी सोडून जाण्याने वंचित बहुजन आघाडीला खुप फरक पडेल अस जर तुम्हाला वाटत असेल तर ते शेखचिल्लिनीने पाहीलेल दिवा स्वप्न होय. तुम्ही गेल्याने तुमचच नुकसान झालय तुम्ही इमानदार आंबेडकरी समाजाच्या कार्यकर्त्यांचा पाठींबा गमविला आहे. असे वंचितचे युवा नेते अजय सरवदे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले.