परभणी(प्रतिनिधी)परभणी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार डॉ.राहुल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त 15 ऑक्टोंबर रोजी जिंतूर रस्त्यावरील नूतन महाविद्यालयाच्या मैदानावर अभिनेते आदेश बांदेकर यांचा होम मिनिस्टर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी आदेश बांदेकर स्वतः परभणीत उपस्थित राहणार असून त्यांच्या उपस्थितीत महिलांसाठी दर्जेदार होम मिनिस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

मागील काही दिवसांपासून आ. डॉ.पाटील यांच्या वतीने महिलांसाठी विविध सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत. आरोग्य शिबिर, रोजगार शिबिर आदींच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचे काम केले जात आहे. आता महिलांना एक विरंगुळा म्हणून महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा तसेच मनोरंजनासाठी वाढदिवसानिमित्त अभिनेते व शिवसेना उपनेते आदेश बांदेकर यांच्या प्रमुख उपस्थित होम मिनिस्टर या स्पर्धेचे आयोजन नूतन महाविद्यालयाच्या मैदानावर करण्यात आले आहे.

 यासाठी नूतन महाविद्यालयाच्या मैदानावर भव्य मंडप उभारण्यात येत आहे. उपस्थित सर्वच महिलांना या स्पर्धेत सहभागी होता येणार असून प्रत्येक सहभागी महिलांना पारितोषिक दिले जाणार आहे.

 या स्पर्धेत आदेश बांदेकर हे आपल्या खास शैलीत विविध स्पर्धा घेणार आहेत.

शनिवार दिनांक 15 ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजता ही स्पर्धा होणार आहे.

या स्पर्धेत मानाची पैठणी व अन्य 500 महिलांना विविध आकर्षक पारितोषिक वितरित करण्यात येणार आहेत. 

 ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शिवसेनेच्या महिला आघाडीच्या विधानसभा संघटक अंबिका डहाळे, अंजली पवार, वंदना कदम, द्रोपदी जावळे, प्रयाग आहेर, कविता नंदुरे, स्मिता बंडेवार, कमल कासले, मंगल पाटील, प्रतिभा लाडके, अर्चना शहाणे, विद्या मालेवार, वैष्णवी देशमुख, सुचिता गिरी, मीरा कराळे, सुनीता कांबळे, उषा मुंडे, अर्चना चिंचाणे, श्वेता अग्रवाल, सुचिता डहाळे, रेणुका पवार, संध्या शहाणे, उर्मिला पोरवाल, कीर्ती चौधरी, सरोज गट्टाणी, संगीता टेहरे या महिला पुढाकार घेत आहेत. या स्पर्धेत शहरातील तसेच मतदार संघातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन महिला आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.