सदर केसची हकीगत अशी की, फिर्यादी कारभारी हरिभाऊ गर्जे यांच्या फिर्यादीवरून दिनांक 15/04/2022 रोजी रात्री 9.45 च्या सुमारास फिर्यादीचा मुलगा शत्रुघन कारभारी गर्जे (रा. कापसी ता. आष्टी) यास गावातील ज्योतिबाची यात्रा व कावड मिरवणूक असताना आबु गर्जे इतर 9 जणांनी मागील भांडणाच्या राजकीय कारणावरून शिवीगाळ करून लाथा बुक्याने मारहाण केली. तसेच अबू गर्जे याने त्याच्या हातातील लाकडी दांड्याने शत्रगुण यांच्या डोक्यात जबर मारहाण करून दुखापत केली व फिर्यादी कारभारी हरिभाऊ गर्जे यास अबू गर्जे याने त्याच्या हातातील लोखंडी गजाने उजव्या हातावर डाव्या पायावर जबर फॅक्चर केले. तसेच भांडण सोडवण्यासाठी आलेल्या अश्रुबा नामदेव गोल्हार यांच्या हाताला फॅक्चर केले. अशा प्रकारची फिर्याद दि. 20/04/2022 रोजी दाखल केली होती. सदर फिर्यादीच्या अनुषंगाने आरोपीच्या विरुद्ध पोलीस स्टेशन अंमळनेर येथे गु. र. नं. 38/2022 व कलम 147, 148, 149,323, 325, 307, 504, 506, 34 भा.द.वी. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता व आरोपीला अटक करण्यात आली होती. आरोपी अबू गर्जे यांनी जामीन मिळावा म्हणून अँड. तेजस सुभाष नेहरकर यांच्यामार्फत फौजदारी जामीन अर्ज क्र. 821/2022 माननीय जिल्हा व सत्र न्यायाधीश साहेब यांच्याकडे जामीन अर्ज दाखल केला होता. त्या जामीन अर्जावर दिनांक 28/09/2022 रोजी अँड. तेजस सुभाष नेहरकर यांचा प्रभावी व्यक्तिवाद ग्राह्य धरून व आरोपीच्या वतीने घेण्यात आलेला बचाव या सर्व गोष्टीचा विचार करून मा. न्यायालयाने जामीन मंजूर केलेला आहे. तरी या प्रकरणाकडे आष्टी तालुक्याचे लक्ष लागले होते.

Sponsored

भारी बचत कार और फ्यूल दोनों पर - भाटिया एंड कंपनी बूंदी

मारुती सुजुकी S-CNG कार खरीदने पर अब CNG भरवाएं मात्र ₹ 76.22 per/kg की कीमत में, मार्केट रेट से ₹ 13.46 कम कीमत में | मारुती कार खरीदने पर भारी बचत | नियम और शर्तें लागू |