चिपळूण : तालुक्यातील राधागोविंद फाऊंडेशनतर्फे सावर्डे पंचक्रोशीतील महिला युवतीकरिता भव्य "गरबा महोत्सव" आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार शेखर निकम यांच्या उपस्थितीत पार पडले.
महिलांच्या सर्जनशक्तीशी म्हणजेच नवनिर्मितीच्या क्षमतेशी संबंधित हा उत्सव आहे. शारदीय नवरात्रात गरबा नृत्यात मध्यभागी घडा ठेवला जातो. या मातीच्या घड्याला छिद्रे पाडली जातात आणि त्यामध्ये दिवा प्रज्वलित केला जातो. या घड्याभोवती महिला, मुली फेर धरतात आणि देवीची स्तुतीपर गीते म्हणून पारंपरिक नृत्य करतात. हा घट अथवा कुंभ हा स्त्रीच्या सर्जन शक्तीचे प्रतीक मानला जातो.
गुजरातमधील पारंपरिक धार्मिक आशय असलेले गरबा नृत्य 1980 सालाच्या आसपास सार्वजनिक रूपात केले जाऊ लागले. त्यापुरी मेवाड मधील विविध मंदिरांमध्ये शारदीय नवरात्र काळात हे नृत्य केले जात असे. तरुणाईला आकर्षण वाटावे यासाठी या नृत्याचे स्वरूप आधुनिक केले गेले. पारंपरिक देवी गीतांच्या जोडीने आधुनिक गीते गायली जाऊ लागली आणि त्या तालावर गरबा नृत्य केले जाऊ लागले. दांडिया घेऊन नृत्य करणे हे गरबा नृत्याचे आधुनिक व्यावसायिक रूप आहे. गरबा हा कलाप्रकार देवीच्या उपासनेशी आणि मनोरंजनासाठी प्रसिद्ध झाल्याने संपूर्ण भारतभरात गुजराथी आणि अन्य भारतीय नागरिक याचा दरवर्षी शारदीय नवरात्र काळात गावोगावी विशेष आनंद घेतात.
या कार्यक्रमावेळी आकांक्षा पवार, चिपळूण माजी सभापती पुजा निकम, महेश महाडीक, राजेंद्र वारे, काटेसर, जमीर मुल्लाजी, सई निकम-सुर्वे, पाटील मॅडम, भोसले मॅडम, मुक्ता निकम, मीरा जोशी आदी उपस्थित होते.