बीड (प्रतिनिधी) बीड शहरातील नामांकित मॅक्स क्युअर हॉस्पिटल व जय हिंद एज्युकेशन कॅम्पस यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून जय हिंद उर्दू हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज जय हिंद कॅम्पस मिल्लत नगर बीड या ठिकाणी मोफत लोकनेते विनायकरावजी मेटे मेडिकल कॅम्पचे आयोजन करण्यात आलेले होते
सदरील लोकनेते विनायक रावजी मेटे मेडिकल कॅम्पचे उद्घाटन मॅक्स क्यूअर हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर शेख फिरोज यांच्या हस्ते व जय हिंद कॅम्पस चे सचिव शेख निजाम जैनुद्दीन,कय्युम इनामदार, शेख कदीर, शेख रऊफ, शेख समीर सरकार, शेख रहेमत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला सदरील मेडिकल कॅम्पमध्ये उपरोक्त परिसरातील आबाल वृद्धांची मोफत आरोग्य तपासणी करून सल्ला, तपासणी, औषध उपचार करण्यात आला सदरील कार्यक्रमास परिसरातील नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद देऊन आपल्या आरोग्याची तपासणी करून घेतली सदरील मेडिकल कॅम्प करण्यासाठी मॅक्स क्युअर हॉस्पिटलचे सर्व सहकारी डॉक्टर पॅरामेडिकल स्टाफ व जय हिंद कॅम्पसचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले