मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वांत मोठे बंड करीत शिवसेनेतील ४० आमदार घेऊन थेट महाराष्ट्राची सत्ता काबीज केली आहे. भारतीय जनता पक्षाच्या साथीने ते मुख्यमंत्री झाले. तेव्हापासून उद्धव ठाकरे गटाला धक्का देण्याचे त्यांचे तंत्र सुरूच आहे.म्हसळा तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी आणी शिवसैनिकांनी महाडचे आमदार शिंदे गटाचे प्रतोद भरतशेठ गोगावले यांचा उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला.या प्रवेश कर्त्यामध्ये प्रसाद बोरले, 

अमोल पेंढारी,प्रवीण (बाबू) बनकर, बबन वाजे, दीपेश जाधव, राजेंद्र मोहिते, मनोज निगुडकर यांचा समावेश आहे.यावेळी म्हसळा तालुक्यातील शिंदे गटाचे पदाधिकारी यांची निवड सुद्धा करण्यात आली.प्रसाद बोरले 

यांची तालुका प्रमुखपदी ,अमोल पेंढारी यांची संपर्क प्रमुखपदी तर प्रवीण (बाबू) बनकर,उपतालुका प्रमुख 

पदी निवड करण्यात आली.

      शिवसेनेत असताना म्हसळा तालुक्यात कोणतेही विकासकामे झाली नाहीत. येणाऱ्या आगामी काळात आम्ही म्हसळा तालुक्यात विकासाची गंगा आणू असे नवनिर्वाचित तालुका प्रमुख प्रसाद बोरले यांनी यावेळी सांगितले. संपर्क प्रमुख सचिन पाटेकर हे मागील अनेक महिने श्रीवर्धन आणी म्हसळा येथे तळ ठोकून आहेत.त्यांचा प्रयत्नाने आज श्रीवर्धन मतदार संघात शिंदे गटाची ताकद वाढत आहे