रत्नागिरी : भारतीय जनता पार्टी रत्नागिरी शहरच्यावतीने सेवा पंधरवडा साजरा करताना प्रभाग क्र ७ येथील दामले विद्यायलयात डेरवणच्या वालावलकर हॉस्पिटलच्या माध्यमातुन मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजीत करण्यात आले होते. ॲड दीपक पटवर्धन यांच्या हस्ते शिबीराचे दिपप्रज्वलन करुन उद्घाटन करण्यात आले.
या शिबीराचा अनेक नागरीकांनी लाभ घेतला . शस्त्रक्रिया, औषधोपचार, महिलांचे आजार, अस्थिरोग, कान नाक डोळे यांवर तपासणी करण्यात आली. यावेळी डॉ. बालाजी, डॉ. नील, डॉ. अक्षय, डॉ. नंदन, डॉ. रुद्र , डॉ. शिवानी यांनी नागरीकांच्या समस्या जाणुन घेवुन त्यांना औषधे सुचविली. ज्या रुग्णांना शस्त्रक्रिया आवश्यक आहे त्यांना हॉस्पिटल मार्फत माफक दरात शस्त्रक्रिया सुचविण्यात आली.
यावेळी भाजपा सरचिटणीस राजेश सावंत , तालुकाध्यक्ष मुन्ना चवंडे , महिला अध्यक्षा सौ ऐश्वर्या जठार , सेवा पंधरवडा संयोजक दादा ढेकणे ,महिला शहर अध्यक्षा सौ आंबेरकर , तालुकाध्यक्षा सौ तनया शिवलकर , महिला जिल्हा सरचिटणीस सौ शिल्पाताई मराठे , सौ प्राजक्ता रुमडे , सौवर्षा ढेकणे, शहर सरचिटणीस राजन पटवर्धन , नगरसेवक राजु तोडणकर , लिलाधर भडकमकर , विक्रम जैन , संदिप सुर्वे , राजु भाटलेकर , प्रमोद खेडेकर , पमु पाटील ,निशांत राजपाल ,राजन फाळके ,राजीव कीर , प्रविण देसाई , श्री व सौ ओमकर फडके ,शेखर लेले , प्रविण रुमडे , सौ राजश्री मोरे ,शैलु बेर्डे , सौ सायली बेर्डे ,श्रीमती विद्या सुर्वे , सौ धृवी लाकडे आणि ईतर भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते . आत्मनिर्भर भारतचे भाजपा जिल्हा संयोजक राजीव कीर व जिल्हा चिटणीस प्रमोद खेडेकर यांच्या माध्यमातुन या शिबीराचे आयोजन करण्यात आले.